घरताज्या घडामोडीराष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची शरद पवार घेणार बैठक, विजयाचा कानमंत्र देणार

राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची शरद पवार घेणार बैठक, विजयाचा कानमंत्र देणार

Subscribe

पराभूत उमेदवारांना निवडणूकीदरम्यान आलेल्या अडचणी सोडवण्यात येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी आगामी महापालिका निवडणूका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार मागील विधानसभा आणि इतर निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या राष्ट्रवादी उमेदवारांची बैठक घेणार आहे. शरद पवार या उमेदवारांना विजयाचा कानमंत्र देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उमेदवारांच्या अडचणी आणि पराभूत होण्यामागील कारणांवर चर्चा करुन समस्या सोडवण्यात येणार आहे. तसेच जे उमेदवार विजयी झाले आहेत त्यांचीही मुंबई येथे शरद पवार यांच्या उपस्थित बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोना संकटामुळे उमेदवारांची बैठक घेण्यात विलंब झाला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची बैठक घेणार आहेत. उमेदवारांची बैठक मुंबई येथे होणार असून या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांना निवडणूकीदरम्यान आलेल्या अडचणी सोडवण्यात येणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी जळगाव दौऱ्यादरम्यान दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आणि उमेदवारांची आढावा बैठक शरद पवार यांच्या उपस्थित होत असते. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या बैठका होऊ शकल्या नाहीत. सध्या कोरनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असल्यामुळे शरद पवार पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत.

- Advertisement -

मागील विधानसभा निवडणूक आणि विविध निवडणूकांमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक घेऊन त्या उमेदवारांचे प्रश्न शरद पवार समजून घेणार आहेत. तसेच आगामी महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादीकडून रणनिती आखण्यात येण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जनजागृती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

केंद्र सरकराने ओबीसींची फसगत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमावारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला अधिकार दिले आहेत. मात्र केंद्र सरकारने ओबीसींची शुद्ध फसवणूक केली आहे. राज्य सरकारद्वारे केंद्राकडे इम्पेरिकल डेटाची मागणी करण्यात येत आहे. केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणना करुन राज्याला इम्पेरिकल डेटा द्यावा अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. तसेच आरक्षणातील ५० टक्क्यांची अट शिथिल करण्यात यावी असेही शरद पवार यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करुन राज्याला अधिकार दिले म्हणजे आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असे काही लोकांना वाटत असल्याने जनजागृती करणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -