घरदेश-विदेशपित्ताशयाच्या त्रासामुळे शरद पवार हॉस्पिटलमध्ये; ३१ मार्चला शस्त्रक्रिया

पित्ताशयाच्या त्रासामुळे शरद पवार हॉस्पिटलमध्ये; ३१ मार्चला शस्त्रक्रिया

Subscribe

ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलात दाखल, किमान दोन आठवड्यांची विश्रांती घ्यावी लागणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास होत असून बुधवारी ३१ मार्च रोजी त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना किमान दोन आठवड्यांची विश्रांती घ्यावी लागणार असल्यामुळे शरद पवार यांचे सर्व नियोजित दौरे दोन आठवड्याने पुढे ढकलण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. शरद पवार यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचे मलिक म्हणाले.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. पवारांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले. त्यामुळे पवार यांना 31 मार्चला रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यात येणार आहे. शरद पवारांवर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. शरद पवारांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

- Advertisement -

बाबांना पित्ताशयाचा त्रास – सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करून पवारांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. बाबांना पित्ताशयाचा त्रास होत आहे. त्यामुळे त्याकडे तातडीने लक्ष देऊन उपचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच त्यांना बुधवार 31 मार्चला10 दिवसांसाठी रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यात येणार आहे. त्यानंतर ते घरीच विश्रांती घेतील,असेही सुप्रिया यांनी म्हटलं आहे.

पवारांची प्रकृती थोडी नाजूक

शरद पवारांच्या प्रकृतीविषयी रविवारीच सुप्रियाताईंकडून समजले होते, त्याविषयी माझी मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा झाली होती. त्यांची प्रकृती थोडी नाजूक आहे, असे संजय राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. आम्ही प्रार्थना करतोय की त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम मिळो आणि आमच्यापेक्षा तरूण असलेले ते नेते पुन्हा आमच्यासोबत कामाला लागोत, असे संजय राऊत म्हणाले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -