Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र ... तर हमाल, गिरणी कामगारांचं जीवन उद्ध्वस्त होईल; शरद पवारांनी दिला इशारा

… तर हमाल, गिरणी कामगारांचं जीवन उद्ध्वस्त होईल; शरद पवारांनी दिला इशारा

Subscribe

 

अहमदनगरः जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही शक्ती करत आहेत. या शक्तींशी संघर्ष करण्याचे आव्हान आपल्या समोर आहे. संघर्ष केला नाही तर हमाल, गिरणी कामगारांचं जीवन उद्ध्वस्त होईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

- Advertisement -

अहमदनगर येथे हमाल माथाडी कामगारांच्या २१ व्या अधिवेशानचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शरद पवार म्हणाले, ऐतिहासिक कामे करणारे अहमदनगर जिह्यात होऊन गेले आहेत. आज ह्याच जिल्हयातील बाजारपेठा दोन दिवस बंद आहेत. जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या शक्ती हे काम करत आहेत. या शक्तींना आपल्याला पराभूत करायचे आहे. तसे केले नाही तर कष्ट करणारा हमाल, गिरणी कामगार उद्धवस्त होईल. एक शुद्र, दुसरा शुद्र असा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

काही शक्ती देशाला ५० वर्षे मागे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. सामान्य जनतेत संघर्ष कसा निर्माण होईल याची काळजी घेत आहेत. ज्यांच्या हाती सत्ता आहे ते सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. जनतेच्या हिताचे निर्णय घेत नाहीत. कष्टकरी, लहान घटकांसाठी सत्तेचा वापर करत नाहीत. केवळ द्वेष पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.

- Advertisement -

शरद पवार म्हणाले, काही लोकं गुंडगिरीचा वापर करुन माथाडी चळवळीला बदनाम करण्याचे काम करत आहेत. अशा वृत्तीविरोधात आपल्याला एकत्र यायचे आहे. देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आणि त्यांनी ३५ जिल्हे एकत्र करुन एक नवीन राज्यव्यापी मंडळ स्थापन करण्याची भूमिका घेतली. मुळ कायद्यालाच धक्का देण्याचे काम सुरु झाले. पण आजही तो कायदा शिल्लक आहे.

यावेळी हमालांचे दिवंगत नेते शंकरराव घुले यांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यातआले. घुले यांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ माथाडी आणि हमाल क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी दिला. कामगारांसाठी खस्ता खाणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. २५ वर्षे ते नगरसेवक होते. ७ वर्षे अहमदनगरचे नगराध्यक्ष होते, असेही शरद पवार यांनी सांगितले.

 

 

 

- Advertisment -