घरमहाराष्ट्रपुणेSharad Pawar: माँसाहेब जिजाऊच शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक- शरद पवार

Sharad Pawar: माँसाहेब जिजाऊच शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक- शरद पवार

Subscribe

संतभूमी असलेल्या आळंदीमध्ये आयोजित गीता- भक्ती अमृत महोत्सवात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांच्या मनोगतात योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतभर चेतना निर्माण केली

पुणे : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार या पक्षाकडून निषेध व्यक्त केला जात आहे. यामध्ये शरद पवारांनी योगी आदित्यनाथांचा तो दावा खोडून काढत माँसाहेब जिजाऊच शिवाजी महाराराजांच्या मार्गदर्शक असल्याचं वक्तव्य केलं आहे. (Sharad Pawar Maasaheb Jijauch Shivaji Maharajs mentor Pawar refuted Adityanaths claim)

संतभूमी असलेल्या आळंदीमध्ये आयोजित गीता- भक्ती अमृत महोत्सवात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांच्या मनोगतात योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतभर चेतना निर्माण केली. त्या कालखंडात औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान देत असताना त्यांनी औरंगजेबाला इथे मरण्यासाठी सोडलं. तेव्हापासून आजपर्यंत औरंगजेबाला कुणीही विचारत नाही. ही शौर्य आणि पराक्रमाची धरणी आहे, कारण या मातीत पूज्य संतांचे सानिध्य प्राप्त झाले असेही यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून निषेध व्यक्त केल्या जात असून, खासदार शरद पवारांनीही मुख्यमंत्री आदित्यनाथांचा तो दावा खोडून काढला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Rohit Pawar : महाराष्ट्रातील थोर व्यक्तींचा इतिहास आधी…; रोहित पवारांचा आदित्यनाथांवर निशाणा

काय म्हणाले शरद पवार?

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या वक्तव्याबाबत शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले की, आमच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामध्ये माँसाहेब जिजाऊ यांचे योगदान आहे. जिजाबाईंनीच शिवाजी महाराजांच्या आयुष्याला दिशा दिली. पण जिजाबाईंनी केलेले कर्तृत्त्व बाजूला सारुन त्याचे श्रेय आणखी कोणाला देण्याची भूमिका काही लोक घेत आहेत. पण शिवाजी महाराजांचं स्वत:चं कर्तृत्व, जिजाबाईंचे मार्गदर्शन यामुळे सगळा इतिहास घडला, हे सगळ्या जगाला माहिती आहे असे म्हणत शरद पवारांनी योगी आदित्यनाथांच्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

- Advertisement -

हेही वाचा : जळगावात गोळीबार, भाजपच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

रोहित पवारांनीही केला ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आमदार रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर पोस्टमध्ये लिहिले की, महाराष्ट्रातील संत आणि थोर व्यक्ती यांच्याबाबत आजवर केवळ भाजपच्याच नेत्यांनी अनेकदा वादग्रस्त आणि आक्षेपार्ह व्यक्तव्य केली आहेत. याच यादीत आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भर पडली. रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं, अशा आशयाचं धादांत खोटं विधान त्यांनी केलं.माझी या भाजपवाल्यांना विनंती आहे ही, एकतर महाराष्ट्रातील संत आणि थोर व्यक्तींचा इतिहास आधी समजून घ्या आणि नंतरच बोला, आणि इतिहास माहीत असूनही जाणीवपूर्वक खोटं बोलत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -