Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र शरद पवार-मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक, या विषयांवर झाली चर्चा

शरद पवार-मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक, या विषयांवर झाली चर्चा

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये जवळपास तासभर बैठक झाली. यावेळी शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन कोटी ३६ लाख रुपयांचा धनादेश दिला.

शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती दिली. रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन कोटी ३६ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांच्या वर्षा निवासस्थानी सुपूर्द केला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी आपले एक दिवसाचे वेतन या निधीसाठी दिलं आहे. कोरोना उपाययोजनांसाठी संस्थेचा हा खारीचा वाटा सहाय्यभूत ठरेल अशी आशा आहे, असं शरद पवार म्हणाले.

याविषयांवर देखील चर्चा?

- Advertisement -

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात इतर मुद्द्यांवर देखील चर्चा झाली असावी. अजूनही राज्यपाल नियुक्त १२ विधानपरिषद सदस्यांचा प्रश्न मिटलेला नाही. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते. यामध्ये राज्यातील पूर परिस्थिती, कोरोना आढावा, ओबीसी राजकीय आरक्षण, राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीचे धाडसत्र आणि महाविकास आघाडीतले समन्वयाचे मुद्दे अशा विषयांवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली.

या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता

राज्यातील पूर परिस्थिती,कोरोना परिस्थिती
१२ आमदारांचा मुद्दा
ओबीसी राजकीय आरक्षण
राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीचे धाडसत्र
महाविकास आघाडीतले समन्वयाचे मुद्दे

पवार-मुख्यमंत्र्यांची राजकीय भेट नाही – अजित पवार

- Advertisement -

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. “पवारसाहेब अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटतात. आज राजकीय चर्चा नाही. असती तर आम्हाला बोलवलं असतं,” असं अजित पवार म्हणाले.

 

- Advertisement -