Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी पवार मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, थोड्याच वेळात करणार मोठी घोषणा

पवार मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, थोड्याच वेळात करणार मोठी घोषणा

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्या भेटीमागचं कारण अद्यापही स्पष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले आहेत.

शरद पवार हे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी ते मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु या भेटीमागील गूढ अद्यापही कायम आहे. मागील २५ मिनिटांपासून शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. साखर कारखानदारीच्या अनुषंगाने शरद पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु शकतात.

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भेटीगाठींचा सिलसिला वाढला आहे. दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या दोघांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली, पण ही भेट अराजकीय असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. परंतु राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस रात्री उशीरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते.

- Advertisement -

समोर आलेल्या माहितीनुसार, एक निवेदन घेऊन शरद पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले आहेत. उद्धव ठाकरे हे परदेशी दौऱ्यावर आहेत. पण ते परदेशात असताना मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागणं आणि त्यांची भेट घेणं, यामागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. एकीकडे महाविकास आघाडी आगामी निवडणुका एकत्रित लढण्याची भूमिका घेत आहे. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी जागांच्या वाटपाबाबत अनेक बैठका देखील होत आहेत. परंतु राज्यात शिंदे सरकार विरुद्ध महाविकास आघाडी असा एक राजकीय संघर्ष आहे. हे सगळं घडत असताना पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं हे आश्चर्यचकित करणारं आहे.


हेही वाचा : आषाढी वारीच्या नियोजनासाठी १० कोटींची तरतूद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती


 

- Advertisment -