Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी ३० तासात पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची दोनदा भेट

३० तासात पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची दोनदा भेट

Subscribe

राज्यातील महाविकास आघाडी सरकार दुसरा वर्धापन दिन साजरी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागील ३० तासात दोन वेळा भेट घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अलबेल असल्याचे हे चित्र दिसत आहे. शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची बुधवारी दुसऱ्यांदा भेट घेतली. पुढील महिन्यात बारामतीमध्ये होणा-या कार्यक्रमाचे निमंत्रण यावेळी पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे सांगण्यात आले आहे.

पुढील महिन्यात बारामतीमध्ये ‘इनोव्हेशन साईंटिफिक रिसर्च इंस्टिट्यूट’चा उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या उदघाटन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका शरद पवार यांनी ठाकरे यांना दिली. या भेटीच्या निमित्ताने दोघांमध्ये राज्यातील महत्वाचे प्रश्न आणि राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाल्याचे कळते.

- Advertisement -

राज्यातील राजकीय स्थिती,केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना करण्यात येणारे लक्ष्य तसेच आगामी काळात होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका आदी विषयांवरही दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते आहे.

दरम्यान,दोन दिवसांपूर्वीही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली होती. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत शेतकऱ्यांना द्यायची मदत तसेच कोरोनाचे निर्बंध शिथिल संदर्भात आणि अवजड वाहनांवरील वाहतूक कर कमी करण्याबाबत त्या भेटीत चर्चा झाली होती. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल. तसेच वित्त आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स बस वाहतूक महासंघाच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृहावर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.चेक पोस्ट्सच्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासंदर्भातही नियोजन करण्यात येईल,असे ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. राज्यातील शहरांमध्ये बसेस आणि ट्रक्स यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहनतळ असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने नगरविकास विभागाला सूचना देण्यात येतील . मोकळ्या जागांचे नियोजन करण्यात येईल असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व विषयांवर निर्णय घेण्यात आले आहेत.


हेही वाचा : झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश


 

- Advertisment -