आता मला सर्व व्यवस्थित दिसतंय; शरद पवार यांची टोलेबाजी

इंदापूर येथील एक रूग्णालयाच्या उद्धघाटन प्रसंगी ते बोलत होते. त्यावेळी शरद पवार म्हणाले, माझ्या दृष्टीसंदर्भात काही दिवसांपूर्वी समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी डॉक्टरांनी दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्याची सुचना केली. मी तत्काळ सांगितले की दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करुन टाका. याला डॉक्टरांनी विरोध केला. तुमच्या दोन्ही डोळ्यांवर एकाच वेळी शस्त्रक्रिया केली तर महाराष्ट्राचे मोठे नुकसान होईल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. आता मला सर्वकाही व्यवस्थित दिसत आहे. कोण काय करतंय हे सांगण्याची किंवा माहिती घेण्याची गरज लागत नाही, असे शरद पवार यांनी सांगितल्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला.

sharad pawar

पुणेः माझ्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करा, असे मी डॉक्टरांना सांगितले होते. पण तुमच्या दोन्ही डोळ्यांवर एकाच वेळी शस्त्रक्रिया झाली तर महाराष्ट्राचे मोठे नुकसान होईल, असा सल्ला डॉक्टरांनी दिल्याची आठवण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितली आणि कार्यक्रमात एकच हशा पिकला.

इंदापूर येथील एक रूग्णालयाच्या उद्धघाटन प्रसंगी ते बोलत होते. त्यावेळी शरद पवार म्हणाले, माझ्या दृष्टीसंदर्भात काही दिवसांपूर्वी समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी डॉक्टरांनी दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्याची सुचना केली. मी तत्काळ सांगितले की दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करुन टाका. याला डॉक्टरांनी विरोध केला. तुमच्या दोन्ही डोळ्यांवर एकाच वेळी शस्त्रक्रिया केली तर महाराष्ट्राचे मोठे नुकसान होईल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. आता मला सर्वकाही व्यवस्थित दिसत आहे. कोण काय करतंय हे सांगण्याची किंवा माहिती घेण्याची गरज लागत नाही, असे शरद पवार यांनी सांगितल्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निकालावरही शरद पवार यांनी शुक्रवारी भाष्य केले होते. एकदा निकाल आल्यानंतर त्यावर चर्चा करता येत नाही, तो निकाल मान्य करत नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा फार काही परिणाम होत नाही, लोक ते चिन्ह स्वीकारतात, असा सल्ला शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंनी दिला. पुढे शरद पवार म्हणाले की, काँग्रसमध्ये एकदा इंदिरा गांधी हा वाद झाला, त्यावेळी काँग्रेसचं चिन्ह गेलं, काँग्रेसने हात हे चिन्ह घेतलं आणि लोकांनी ते मान्य केलं, आता उद्धव ठाकरेंनी नवीन चिन्ह घेतलं तर ते लोक मान्य करतील, फार परिणाम होत नाही. महिना पंधरा दिवस चर्चा होईल.

शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनीही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावर टीका केली. आम्ही सर्व उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.