कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. “अमित शहा सातत्याने हल्ली जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेतृत्त्वाने घेतली आहे. अमित शाह आणि त्यांचा बोलण्याची पद्धत अतिटोकाची आहे. देशाचे गृहमंत्री अधिक तारतम्य बाळगून भाष्य करतील, अशी अपेक्षा असते. पण याची प्रचिती त्यांच्याकडून काही येत नाही. खरं म्हणाले तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत. अमित शहा हे कोल्हापूरला शिकले की कुठे शिकले? मला माहिती नाही.” असे म्हणत टीका केली. (Sharad Pawar NCP SP on Amit Shah BJP ciriticized Uday Samant)
हेही वाचा : Saif Ali Khan : 16 जानेवारीच्या रात्री काय घडलेलं? सैफन दिली खडान-खडा माहिती; म्हणाला, हल्लेखोरानं…
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उबाठा गटातील काही आमदार, खासदार संपर्कात असल्याचे सांगितले होते. यावर उदय सामंत दावोसला भांडवली गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की लोक फोडायला गेले होते ते माहिती नाही. त्यांनी जी काही विधान केली आहेत, ती मुख्यमंत्र्यांच्या दावोसचा उद्देश होता त्याला सुसंगत नव्हती, असे पवार म्हणाले. मी काही फोटो पाहिले, ते लोक ठाकरेंची सेना सोडतील असे वाटत नाही. तसेच काही माणसं अशी आहेत की ते पक्ष आणि बाळासाहेबांची विचारधारा अजिबात सोडणार नाहीत, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी यावेळी बोलताना दिले.
शरद पवार म्हणाले की, ” मीसुद्धा मुख्यमंत्री असताना दावोसला गेलो होतो. तिथे सध्या जे करार झाले त्यामध्ये भारत फोर्जशी करार झाला, तसेच पुणे, कराडला त्यांचे कारखाने आहेत. जिंदाल हे स्टीलच्या फॅक्टरीत महाराष्ट्रात रत्नागिरी, नाशिक जिल्ह्यात आहेत. दावोसमधून हे जाहीर केले, याचा अर्थ ज्यांनी गुंतवणूक करायचे ठरवले त्या सगळ्यांना तिथून महाराष्ट्रात आणला, असा देखावा केल्याचे दिसते. आपण या हॉटेलमध्ये बसले आहेत, त्यांचे बंधू यांनी दावोसला करार केला हे माझ्या वाचनात आले आहे,” असे म्हणत त्यांनी टीका केली. ‘फसवणूक असे नाही, नवीन उद्योग करत असतील तर हरकत नाही,’ असे विधान केले.