घरदेश-विदेशअदानी प्रकरणावरुन शरद पवारांची राहुल गांधींना जोरदार चपराक; म्हणाले...

अदानी प्रकरणावरुन शरद पवारांची राहुल गांधींना जोरदार चपराक; म्हणाले…

Subscribe

शरद पवार म्हणाले की, आम्ही हिंडेनबर्ग कंपनीचे नाव कधी ऐकलेलं नव्हतं. त्या कंपनीच्या अहवालात अदानींना लक्ष्य करण्यात आलं असल्याचं दिसतं आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हिंडेनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योग समुहावर आरोप झाल्याप्रकरणात मोठे विधान केले आहे. शरद पवार म्हणाले की, आम्ही हिंडेनबर्ग कंपनीचे नाव कधी ऐकलेलं नव्हतं. त्या कंपनीच्या अहवालात अदानींना लक्ष्य करण्यात आलं असल्याचं दिसतं आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे आणि अदानी प्रकरणावरुन मोदी सरकारला घेरणाऱ्या राहुल गांधींना पवार यांनी जोरदार चपराक लगावली. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनंतर आता संयुक्त संसदीय समितीच्या नियुक्तीची आवश्यकता राहिली नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केलं. ते शुक्रवारी एनडीटीव्ही इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. (Sharad Pawar on Hindenburg company Adani has been targeted in the report of that company NCP leader Sharad pawar )

शरद पवार म्हणाले, एका परदेशी कंपनीच्या अहवालाने देशात खळबळ उडाली. अशाप्रकारची वक्तव्ये याआधीही काही लोकांनी केली होती. काही दिवस संसदेत यावरुन गदारोळही झाला होता. आम्ही तर या कंपनीचं नवा देखील कधी ऐकलं नव्हतं. त्या कंपनीची पार्श्वभूमी माहिती नाही. अशा विषयावर देशात गदारोळ झाला तर त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला भोगावी लागते हे दुर्लक्षित करता येणार नाही.

- Advertisement -

जेपीसी चौकशीतून सत्य बाहेर येईल यावर साशंकता

या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमावी, अशी विरोधकांची मागणी होती. पण संयुक्त संसदीय समितीने हा मुद्दा सुटणारा नव्हता. ही समिती नेमली तर देखरेख सत्ताधारी पक्षाकडे असते. ही मागणी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात होती. त्यामुळे चौकशीसाठी नेमलेल्या समितीत सत्ताधारी पक्षाचे बहुमत असेल, तर सत्य कसं बाहेर येईल? हा चिंतेचा विषय आहे. सर्वोच्च न्यायालयावर कोणीही प्रभाव टाकू शकत नाही, त्यांनी चौकशी केली, तर सत्य समोर येण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने चौकशीची घोषणा केल्यानंतर संयुक्त संसदीय समिती चौकशीचे महत्त्व राहिले नाही. संयुक्त संसदीय समिती चौकशीसाठी पुढे जाण्यामागे काॅेग्रेसचा हेतू काय होता? ? यावर त्यांचा विश्वास होता का? या प्रश्नांबाबत मी सांगू शकत नाही, परंतु मला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी नियुक्त केलेली समिती खूप महत्त्वाची होती.

( हेही वाचा: वर्षा, सागर बंगल्यावरील खानपानाला कात्री; मांसाहारी थाळी १७५ तर शाकाहारी १६० रुपयांना )

- Advertisement -

शरद पवार यांनी राहुल गांधींच्या अदानी-अंबानी या बड्या उद्योगपतींना लक्ष्य करण्याच्या शैलीशी सहमत नसल्याचे स्पष्ट केलं. भुतकाळातील टाटा-बिर्ला कथेाच संदर्भ देत ते म्हणाले की, आम्ही राजकारणात प्रवेश केला तेव्हा टाटा-बिर्ला यांच्यावरुन हल्लाबोल करायचो. पण या देशात टाटांचे योगदान किती आहे, हे नंतर कळालं. आजकाल टाटा-बिर्ला ऐवजी अदानी-अंबानींवर हल्ले होत आहेत. अदानी यांनी ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असे म्हणतं त्यांनी अदानी समुहाचं कौतुक केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -