पुणे : ज्यांच्याकडे कायदा आणि सुव्यस्थेची जबाबदारी आहे, त्यांनी दुर्लक्ष करून चालणार नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निखिल वागळेंच्या हल्ल्यावरून लगावला. आजचे राज्यकर्ते हे झुंडशाहीने जाऊ इच्छितात. ही झुंडशाही लोकांना पटणारी नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी पुण्यात भाजपाच्या नेत्यांनी निखिल वागळेंवर केलेल्या हल्ल्यावर दिली आहे.
भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून निखिल वागळे यांच्यावर हल्ला करण्यात आला? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “साधी गोष्टी आहे. काल जो पुण्यातमध्ये एका जानकार व्यक्तीवर हल्ला केला गेला. त्याच्या गाडीवर हल्ला केला, गाडीच्या काचा फोडल्या गेला. याचा अर्थ स्पष्ट आहे की, आजचे राज्यकर्ते हे झुंडशाहीने जाऊ इच्छितात. ही झुंडशाही लोकांना पटणारी नाही. सत्ता आणि पोलीस दल हातात आहे. याचा गैर फायदा घेण्याचा जाणवीपूर्वक प्रयत्न सुरू आहे. माझी खात्री आहे की, पुण्याचा नव्हे तर, महाराष्ट्रातील नागरिक हा या प्रकवृत्तीला योग्यवेळी योग्य धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. या पक्षाच्या राज्य आणि देशातील पक्षाच्या नेत्यांनी गंभीर दखल घेण्याची आवश्यकता होती. पण ती दखल घेतली नाही. ही दुर्दैवीबाब आहे.”
हेही वाचा – Fadnavis On Raut : कोण संजय राऊत ? देवेंद्र फडणवीसांचा थेट सवाल
या प्रकरणामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितील जात आहे हा प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले, “विरोधकांनी मागणी करणे हे त्यांचे कर्तत्व आहे. मी काय त्या खोलात जाऊ इच्छित नाही. पण या गोष्टी करतआहेत. त्यावेळाला ज्यांच्याकडे कायदा आणि सुव्यस्थेची जबाबदारी आहे, त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही.”
राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शने इतिहास घडला
रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले, असे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, “आमच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व याच्या पाठीमागे राजमाता जिजाबाई याचे मोठे योगदान आहे. व्यक्तिमत्व घडवणे, दिशा देणे, हे सर्व काम राजमाता जिजाऊ यांनी केली आहे. राजमाता जिजाऊचे कर्तृत्व हे बाजूला सारून त्यांच्याशिवाय आणखी कोणाला तरी द्याचे. ही भूमिका काही लोक घेत आहेत. पण सगळ्या जगाला माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वत:चे कर्तृत्व, कष्ट आणि राजमाता जिजाऊ यांचे मार्गदर्शन यामुळे हा इतिहास घडेला आहे,” असेही शरद पवार म्हणाले.