घरदेश-विदेशदेशाची आणि राज्याची सूत्रे ज्यांच्याकडे आहेत त्यांनी... शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

देशाची आणि राज्याची सूत्रे ज्यांच्याकडे आहेत त्यांनी… शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Subscribe

जेव्हा माझ्याकडे केंद्राची जबाबदारी होती. तेव्हा तीन महिन्यांच्या आत 72 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. याचाच दाखला देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

राजकरण म्हटलं की नेतेमंडळींकडून एकमेकांवर टीका टिप्पणी करत असतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रसरकारवर चांगलाच हल्लबोल केला आहे. सध्या देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. यावरूनच शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. देशाची आणि राज्याची सूत्रे ज्यांच्याकडे आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या हिताची जपणूक करण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे पण तास होत नाहीय. जेव्हा माझ्याकडे केंद्राची जबाबदारी होती. तेव्हा तीन महिन्यांच्या आत 72 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. याचाच दाखला देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

दरम्यान पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांशी शरद पवारांनी संवाद साधला. त्यावेळी एका शेतकऱ्याने शरद पवार यांना बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला. त्यावर शरद पवार म्हणाले, “जेजुरीच्या सहकऱ्यांनी सांगितले, बाहेर फिरु नये. त्यांना वाटतं मी म्हातारा झालो. कुणी सांगतिलं मी म्हातारा झालो, तुम्ही काय बघितलं? मी म्हातारा झालो नाही,” शरद पवार असं म्हणाले आणि उपस्थित असलेल्या सर्वांमध्येच हश्या पिकाला.

- Advertisement -

शरद पवार जेव्हा केंद्रीय मंत्री होते तेव्हाचा दाखला देत पवार म्हणाले, “मी केंद्रीय मंत्री असताना देशात फळबाग योजना आणली. त्याअंतर्गत फळबाग घेण्यासाठी आर्थिक सहाय्य सुद्धा केले. कोकणात गेला तर, काजू आणि हापूस आंब्याचे हजारो एकर क्षेत्र आहे. एकेकाळी कोकणाचे लोक 16 वर्षे वय झाले की, मुंबईला कामासाठी जायचे. 60 वय झालं की पुन्हा गावाकडे माघारी यायचे. आज मुंबईला जायची भूमिका कोकणातील लोकांची नाही. फळबाग योजनेतून जास्तीत जास्त आंबा, काजू, फणस इत्यादी झाडांची लागवड करून त्यातून उत्पन्न घेतात आणि आज यासाठीच प्रयत्न करतात,” असं सुद्धा शरद पवार यांनी नमूद केले.


हे ही वाचा – शेतकऱ्यांनी त्यांच्यावर पहिला आसूड ओढला पाहिजे; दानवेंची ठाकरेंवर जहरी टीका

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -