Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी काळजी घ्या! शरद पवारांकडून जालन्यातील मराठा समाजाच्या जखमी आंदोलकांची विचारपूस

काळजी घ्या! शरद पवारांकडून जालन्यातील मराठा समाजाच्या जखमी आंदोलकांची विचारपूस

Subscribe

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी आंदोलकांची राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विचारपूस केली. (Sharad Pawar questioned the injured protesters in Jalna)

शरद पवार शनिवारी दुपारच्या सुमारास जालन्यातील आंदोलनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी जखमींनी शरद पवारांकडे पोलिसांच्या लाठीचार्जबाबत तक्रार केली. तसेच, शरद पवार यांनीही यावेळी सर्व घटना जखमींकडून जाणून घेतला. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते.

- Advertisement -

शरद पवार यांनी विचारपूस केल्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल केल्याचे जखमींनी सांगितले. तसेच, ‘आम्हाला पोलीसांनी बेदम मारहाण केली. आम्हाला एवढं मारलं पोलिसांनी आम्ही जखमी झाल्यावर आम्हाला रुग्णवाहिकाही दिली नाही’, अशी माहिती जखमी महिला आंदोलकांनी पोलिसांना दिली.

मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे हे आपल्या 10 सहकाऱ्यांसोबत आमरण उपोषणाला बसले होते. काल, शुक्रवारी पोलिसांकडून या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. पोलिसांकडून गोळीबार देखील करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. या घटनेचे हिंसक पडसाद आता राज्यातील विविध भागांमध्ये उमटायला सुरुवात झाली असून या प्रकरणामुळे अनेक जिल्ह्यांत बंदची हाक देण्यात आली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण…, जालन्यातील स्थितीबाबत रोहित पवारांची टिप्पणी

- Advertisment -