Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी प्रशांत किशोर भेटीनंतर शरद पवार दिल्लीत दाखल, राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

प्रशांत किशोर भेटीनंतर शरद पवार दिल्लीत दाखल, राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

मोदी-ठाकरेंच्या भेटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच दिल्लीत दाखल झाल्यामुळे अनेक नेत्यांच्या नजरा

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान शरद पवार यांच्या भेटीनंतर आता शरद पवार दिल्लीत गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढविले जात आहेत. शरद पवार यांच्या काही नेत्यांसोबत भेटीगाठी होणार असल्याचे म्हटलं जात आहे. केरळच्या नेत्यांची भेट होणार असल्याचेही समजले आहे. परंतु निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट आणि मोदी-ठाकरेंच्या भेटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच दिल्लीत दाखल झाल्यामुळे अनेक नेत्यांच्या नजरा शरद पवार नक्की कोणती भूमिका आणि कोणाच्या भेटी घेतायत याकडे लागले आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये स्वबळाचा नारा सुरु आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे टिकणार आणि पुढेही सोबत काम करणार असं म्हटलं आहे. तसेच शिवसेना विश्वासू पक्ष असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही विश्वास आहे. असं सांगताना शरद पवार यांनी बाळासाहेबांनी इंदिरा गांधी यांना दिलेला शब्द पाळला असल्याची आठवणही करुन दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत निवडणूक लढवेल असेही शरद पवार यांनी वर्धापन दिनाच्या दिवशी म्हटलं आहे.

सरनाईकांच्या पत्रानं खळबळ

- Advertisement -

सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे. कोणताही गुन्हा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाला व शिवसोनेमुळे माजी खासदार” झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरु आहे त्यालाई कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट असताना आमच्या कुटुंबियांवर सुध्दा सतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे , त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल. अस शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रातून शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना म्हटलं आहे.

प्रशांत किशोर यांची भेट

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली होती. प्रशांत किशोर शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्वर ओकवर आले होते. यावेळी शरद पवार यांनी राजकीय आणि देशपातळीवरील राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली असल्याचं बोललं जात आहे. भाजपविरोधात मोट बांधण्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. देशात केंद्रामध्ये सत्तेत असेल्या भाजपला तगडा विरोधी पक्ष म्हणून तयारी सुरु असल्यामुळे या पार्श्वभूमीवरही या बैठकीकडे पाहिले गेलं आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की , या बैठकीत शरद पवार यांनी चहापान आणि औपचारिक भेट असल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -