‘त्या’ पोस्टवर शरद पवार यांची प्रतिक्रीया, म्हणाले…

Sharad Pawar reacted to Ketki Chitale's post
Sharad Pawar reacted to Ketki Chitale's post

शरद पवारांवर टीका करणे केकीट चितळेला महागात पडले आहे. केतकी चितळेला ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टवर सर्वपक्षांकडून टिका केली जात आहे. यावर स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पतिक्रिया दिली आहे.

केतकीला ओळखत नाही आणि त्या पोस्टबद्दलही माहिती नाही. मला काहीही ठाऊक नाही. कोणत्या व्यक्तीने टीका केली आणि ती व्यक्ती काय बोलली, हे मला माहिती नाही. संबंधित व्यक्ती नेमके काय बोलली, हे जाणून घेतल्याशिवाय मी त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही, असे खासदार शरद पवार म्हणाले.

गेल्या काही दिवसांत माझ्याविरोधात होणाऱ्या तक्रारी वाचनात आल्या. मी एका काव्याचा उल्लेख केला होता. मात्र, त्यानंतर वेगळं चित्र मांडण्यात आले. ते वास्तव नव्हते, असे ही शरद पवार म्हणाले.

दरम्यान यावर राज ठाकेर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. असे लिहिणे ही एक प्रवृत्ती नव्हे मानसिक विकृती आहे. तिला वेळीच आवर घालायला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. तर शरद पवारांबाबत जे काही लिहिले, बोलले गेले ती विकृती आहे, अशे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.