घरमहाराष्ट्रखडसेंच्या राष्ट्रवादीमधील संभाव्य प्रवेशाबाबत शरद पवारांचं महत्त्वाचं विधान!

खडसेंच्या राष्ट्रवादीमधील संभाव्य प्रवेशाबाबत शरद पवारांचं महत्त्वाचं विधान!

Subscribe

एकनाथ खडसे यांनी अद्याप स्वत: आपल्या पक्षांतराविषयी कुठलीही अधिकृत भूमिका मांडलेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू आहे. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य प्रवेशाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी शरद पवार कालपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.

रविवारी त्यांनी तुळजापूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शेतीच्या प्रश्नासोबतच त्यांना अनेक राजकीय प्रश्न विचारण्यात आले. खडसे यांच्याबद्दल ते काय बोलतात याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. खडसे राष्ट्रवादीत येणार की नाही याबाबत पवार थेट काहीही बोलले नसले तरी त्यांनी खडसेंच कौतुक केले आहे. ‘खडसेंचं कर्तृत्व, काम आणि खानदेशातील त्यांच्या स्थानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही,’ असे पवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

…’त्या’ नेत्यांना आता राष्ट्रवादीत एन्ट्री नाही

खडसेंची भाजपने दखल घेतली नाही, पण काय तो राजकीय निर्णय त्यांनी घ्यावा असं वक्तव्य शब्दात शरद पवारांनी यांनी केले आहे. ते म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपच्या उभारणीत त्यांचं मोठे योगदान आहे. खडसेंची भाजपने दखल घेतली नाही, पण काय तो राजकीय निर्णय त्यांनी घ्यावा असे वक्तव्य शब्दात शरद पवारांनी यांनी केलं आहे.

ते म्हणाले की, ’२० वर्षात विरोधात असताना एकनाथ खडसे हे सर्वात प्रभावी होते. मात्र, त्याची नोंद भाजपने घेतली नाही. मला सोडून गेलेले काही संपर्कात आहेत. मात्र, परत घेताना निकष आहेत. उस्मानाबादमध्ये सोडून गेलेल्या नेत्यांना आता राष्ट्रवादीत एन्ट्री नाही, आहे तिथे सुखाने राहा’ असं थेट विधान पवारांनी केले आहे.

- Advertisement -

आपल्या पक्षांतराविषयी अधिकृत भूमिका स्पष्ट नाही

एकनाथ खडसे यांनी अद्याप स्वत: आपल्या पक्षांतराविषयी कुठलीही अधिकृत भूमिका मांडलेली नाही. रविवारी त्यांच्या राजीनाम्याची अफवाही पसरली होती. मात्र, तिचे त्यांनी खंडन केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही खडसे असा कुठलाही निर्णय घेणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, पवारांच्या आजच्या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.


Weather Alert: येत्या २४ तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यात पावसाची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -