घरताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीसांनी ते वसूलीचे सॉफ्टवेअर दाखवावे, शरद पवारांचा फडणवीसांवर पलटवार

देवेंद्र फडणवीसांनी ते वसूलीचे सॉफ्टवेअर दाखवावे, शरद पवारांचा फडणवीसांवर पलटवार

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर वसूलीचे सॉफ्टवेअर तयार केलं असल्याचा गंभीर आरोप केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ते सॉफ्टवेअर दाखवावे आम्हालाही कळेल तो सॉफ्टवेअर कसा आहे. अशा शब्दांत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला आहे. तसेच मुख्यमंत्री होण ही उद्धव ठाकरेंची महत्त्वकांक्षा होती असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले हा किस्सा देखील शरद पवार यांनी सांगितला आहे. फडणवीसांना सत्ता मिळवल्याशिवाय चैन पडणार नाही असे देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना फडणवीसांच्या वसूली सॉफ्टवेअर प्रकरणी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पवारांनी म्हटलं आहे की, माझं म्हणणे आहे की, ते सॉफ्टवेअर देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे आम्हालाही कळेल ते सॉफ्टवेअर नक्की कसे असते. त्याच्यावरुन वसूली कशी होते असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. जे गृहस्थ पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि साधारणता त्या पदावरही मी होतो परंतु त्या पदावर असताना टीका करतो पण टीका करताना काही पथ्य पाळावी लागतात. मुख्यमंत्री किंवा माजी मुख्यमंत्री ही एक संस्था असते त्याची प्रतिष्ठा ठेवावी लागते. त्या संस्थेला धक्का लागू नये. सत्ता नाही. ती गेली त्याचे दुःख एवढे आहे. त्यामुळे त्यांनी मागे सांगितले की, मी आजही मुख्यमंत्री आहे. त्यामुळे असे अजूनही मुख्यमंत्री आहे हे त्यांच्या डोक्यात आहे त्याच्याशी सुसंगत आहे. त्यांना सत्ता मिळाल्याशिवाय चैन पडणार नाही असे मला वाटयाल लागले असल्याचेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र बंगालचा इतिहास

महाराष्ट्राचे बंगाल म्हणजे काय बंगाल हे देशातील राज्य आहे. परंतु इतिहास पाहिले तर बंगाल, महाराष्ट्र, पंजाब ही तीन राष्ट्रे नेहमी एकत्र आहेत. राष्ट्रगीतातही आपण त्याचे एकत्र नाव घेतो. बंगाल भाषा आणि मराठी भाषा अत्यंत जवळची आहे. बंगालमधील साहित्य आणि संस्कृती रविंद्रनाथ टागोर, स्वातंत्र्यांच्या लढ्यात सुभाष चंद्र बोस यांनी योगदान दिले तेच योगदान महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी दिलं असेल किंवा सत्ता नेतृत्वाने दिले हे महाराष्ट्र आणि बंगालचा इतिहास आहे असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : IT Raid: अधिकाऱ्यांना वरुन फोन येत होते, पाहुणेच छापेमारीत कंटाळले, पवारांचा केंद्रावर निशाणा

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -