Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कोरोना साखळी तोडण्यासाठी कठोर पावलं आवश्यक - शरद पवार

कोरोना साखळी तोडण्यासाठी कठोर पावलं आवश्यक – शरद पवार

यशाचा मार्ग काढायचा असले तर या सगळ्या परिस्थितीला धैर्याने, सामुहिकपणाने पुढे जायला पाहिजे.

Related Story

- Advertisement -

देशातल्या कुठल्याही राज्यात कोरोनाची अशी गंभीर परिस्थिती नव्हती. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे ही अतिशय चिंता वाढविणारी बाब आहे. याला तोंड दिले पाहिजे राज्यातील आरोग्य यंत्रणा असेल,डॉक्टर्स, परिचारिका, संलग्न आरोग्य कर्मचारी असतील हे आहोरात्र कष्ट करुन कोरोनाला नियंत्रण आणण्यासाठीचे प्रयत्न करत आहेत. रुग्णांसाठी बेड, वैद्यकीय उपकरणे आणि इतर पायाभूत सुविधा याच्यात देखील प्रचंड ताण आलेला आहे. नाईलाजाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारला काही कठोर निर्बंध लागू करावे लागले आहेत. त्याला काही पर्याय राहिलेला नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारचा या संबंधीचा सुध्दा अग्रह आहे की, आपण या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी थोड्या कठोर पणाचे पाऊले टाकण्याची आवश्यकता आहे. आज या परिस्थीतीला तोंड देण्यासाठी राज्य सरकार जसे सगळ्या प्रयत्नांचे पराकष्ट करत आहेत. रुग्णालये आणि सहकारी प्रयत्न करत आहेत. त्याप्रमाणे केंद्र सरकारसुद्धा राज्याला सहकार्य करण्याची भूमिका घेत आहे. देशाच्या आरोग्यमंत्र्यांशी संपर्क साधला राज्यातील कमतरतांसंबंधी चर्चा केल्या त्यावेळी आरोग्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आश्वासन केले की, केंद्र सरकार आणि आरोग्य खाते महाराष्ट्राच्या पाठीशी आहे त्यामुळे त्यांची मदत आणि आपल्या संगळ्यांचे सामूहिक प्रयत्न यातून आपल्याला पुढे जात मार्ग काढायचा आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

आता कस होत आहे आपण वल्गना आणली की सहाजिकच अस्वस्थता येते. शेतकरी,हमाल, व्यापारी, कामगार, नोकरदार, व्यावसायिक, कष्टकारी अशा सामाजातल्या घटकांना या संकटामुळे फार मोठी झळ बसली आहे. दुकाने व्यावसाय धंदे बंद झाल्याने व्यापारी वर्गाचे नुकसान आहे. फळे, भाजी अशा नाशवंत शेतीमाल तयार करणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या मालाचे काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे देखील अतिशय नुकसान होत आहे. या सगळ्यातून आपण पुढे जात आहेत. पण पुढे जात असताना मार्ग काढताना यशाचा मार्ग काढायचा असले तर या सगळ्या परिस्थितीला धैर्याने, सामुहिकपणाने पुढे जायला पाहिजे.

या परिस्थितीमध्ये सर्व सामजिक घटकांना माझी विनंती आहे की, आपणांना वास्तव नाकारता चालणार नाही. जनतेच्या जिविताचे सुरक्षेच्या दृष्टीने काही निर्णय राज्य सरकारला घ्यावेच लागतील आणि ते घेतले जात आहेत आणि त्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. एकजूटीने सामोरे जाण्यासाठी यंत्रणेला सहकार्य देतील याबाबत शंका नाही. सामूहिक प्रयत्नांनतर आपण सगळे कोरोनाला नक्की घालवू आणि नागरिकांची सुटका करु असे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -