Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राऊतांची भूमिका ऐक्याला पोषक असेल, सामनाच्या अग्रलेखावर पवारांची प्रतिक्रिया

राऊतांची भूमिका ऐक्याला पोषक असेल, सामनाच्या अग्रलेखावर पवारांची प्रतिक्रिया

Subscribe

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं आहे. शरद पवार हे राजकीय वारस निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचं दैनिक सामनाच्या अग्रलेखातून म्हणण्यात आलं आहे. यावेळी शरद पवारांनी सोलापूरातून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राऊतांची भूमिका ऐक्याला पोषक असेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी सामनाच्या अग्रलेखावर दिली आहे.

मी काही सामनाचा अग्रलेख वाचला नाही. परंतु वाचल्यानंतर मी माझं मत व्यक्त करेन. कारण सामनाचे संपादक आणि आम्ही एकत्र काम करतो. त्यामुळे एकत्र काम करत असताना पूर्ण माहिती घेऊन त्यावर भाष्य करणं योग्य आहे. नाहीतर उगीच गैरसमज होतात. पण मला खात्री आहे की, त्यांची भूमिका ऐक्याला पोषक असेल, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि हितचिंतक अस्वस्थ होते. पण सगळ्यांच्या आग्रहाखातर मला राजीनामा मागे घ्यावा लागला. मी अध्यक्षपद सोडलं म्हणजे संघटनेचं काम सोडलं नव्हतं. लोकांशी संपर्क न करण्याचं ठरवलं नव्हतं. परंतु अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण करण्यात आले. मात्र, हे सर्व गैरसमज दूर झाले आहेत. महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे, असं शरद पवार म्हणाले.

मी पुन्हा नव्यानं कामाला सुरूवात केली आहे. तसेच कामाला सुरूवात करण्यासाठी मी दोन ठिकाणं निवडतो. एक म्हणजे कोल्हापूर आणि दुसरं म्हणजे सोलापूर. सोलापूरपासून आपण दौऱ्याला सुरूवात करावी, असा माझा विचार होता. त्यामुळे मी आज याठिकाणी आलो. हे गाव आणि शहर कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारं आहे. सोलापूरात आम्हाला पहिलं काम करावं लागेल. सगळ्यांच्या सुख दुःखात आम्ही सहभागी होणार आहे. कारण लोकांमध्ये सहभाग घेण्याशिवाय अपेक्षा करणं योग्य नाही. मी आता निपाणीला चाललो आहे. त्यामुळे निपाणीला गेल्यावर कोण पार्सल आहे ते लवकरच कळेल, असं म्हणत पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.


- Advertisement -

हेही वाचा : वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले, सामनातून पवारांच्या राजीनाम्यावर भाष्य


 

- Advertisment -