घरताज्या घडामोडीहा तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला - शरद पवार

हा तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला – शरद पवार

Subscribe

गिरीश कुबेर यांना काळं फासल्याच्या घटनेचा शरद पवारांनी तीव्र शब्दांत व्यक्त केला निषेध

मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक गिरीश कुबेर यांच्यावर झालेला हल्ला हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याच्या शब्दांत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या हल्ल्याच्या तीव्र शब्दांत निषेध केला. नाशिकमधील मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कुबेरांवरील हल्ला होणं हे निंदनीय बाब आहे. मी इतिहास तज्ज्ञ नाही. मात्र काही मतमतांतरं असू शकतात आणि ते मांडण्याचं लेेखकाला स्वातंत्र्य असतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण स्विकारलेलं असताना अशाप्रकारचा हल्ला हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे, असे मी मानतो. जर कुणाला काही आक्षेपच असेल तर त्यांनी अशाप्रकारचा हल्ला न करता विधायक मार्गाने आपली मतं मांडण्याचा त्यांना अधिकार आहे, असंही पवारांनी सांगितलं.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -