घरमहाराष्ट्रशरद पवारांना धमकीचा फोन, पण तरीही पूर्ण केला नियोजित दौरा

शरद पवारांना धमकीचा फोन, पण तरीही पूर्ण केला नियोजित दौरा

Subscribe

सोलापूर – आज सोलापूरच्या कुर्डूवाडी दौऱ्यात जाऊ नका, अशा आशयाची धमकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आज सकाळीच मिळाली होती. मात्र, त्यांनी या धमकीला भीक न घालता आपला नियोजित दौरा पूर्ण केला. दरम्यान, ही धमकी कोणी दिली, याचा तपास पोलीस करत आहेत.

सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कुर्डूवाडी येथील पंचायत समिती इमारतीच्या आवारात स्वर्गीय विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शरद पवार हे लोकनेते आहेत. त्यांच्या आजूबाजूला सतत गराडा असतो. ते सतत महाराष्ट्रभर फिरतीवर असतात, त्यामुळे सुरक्षारक्षाही तेवढीच तैनात केलेली असते. मात्र, आज कुर्डूवाडी येथे जाण्याआधी शरद पवारांना धमकी फोन आला होता. ही धमकी कोणी दिली याचा तपास पोलीस घेत आहेत. मात्र, धमकीला घाबरून शरद पवारांनी आपला नियोजित दौरा रद्द न करता निडरपणे पूर्ण केला.

- Advertisement -

पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर बायपास रोडवरील संकेत मंगल कार्यालयात माढा करमाळ्यातील शेतकऱ्यांचा मेळावा आमदार शिंदे बंधू यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमालाही शरद पवारांनी हजेरी रावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -