केतकीचा पुन्हा शरद पवारांवर निशाणा; प्रतिवादी करण्याची याचिकेत मागणी

शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केतकीवर राज्यातील विविध ठिकाणी २२ गुन्हे दाखल आहेत. यातील एका गुन्ह्यात तिला जामीन मंजूर झाला आहे. अन्य गुन्ह्यांमध्ये तिला अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. हे गुन्हे रद्द करण्यासाठी केतकीने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दाखल असलेल्या २२ गुन्ह्यांपैकी एकही तक्रार शरद पवार यांनी केलेली नाही. त्यामुळे त्यांनाही या याचिकेत प्रतिवादी करावे, अशी मागणी केतकीने न्यायालयात केली आहे. 

Ketki Chitale granted bail in objectionable Facebook post case

मुंबईः आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दाखल असलेले गुन्हे रद्द करण्यासाठी केलेल्या याचिकेत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रतिवादी करावे, अशी मागणी अभिनेत्री केतकी चितळे हिने उच्च न्यायालयात केली आहे. यावर १८ जानेवारीला सुनावणी होणार आहे.

शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केतकीवर राज्यातील विविध ठिकाणी २२ गुन्हे दाखल आहेत. यातील एका गुन्ह्यात तिला जामीन मंजूर झाला आहे. अन्य गुन्ह्यांमध्ये तिला अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. हे गुन्हे रद्द करण्यासाठी केतकीने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दाखल असलेल्या २२ गुन्ह्यांपैकी एकही तक्रार शरद पवार यांनी केलेली नाही. त्यामुळे त्यांनाही या याचिकेत प्रतिवादी करावे, अशी मागणी केतकीने न्यायालयात केली आहे.

आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या केतकी चितळेने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. दुसऱ्या कोणी तरी ही पोस्ट लिहिली होती. ती पोस्ट केतकीने आपल्या सोशल मिडिया हॅण्डलवर टाकली होती.  या पोस्टवरून तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. केतकी चितळेने ही पोस्ट करुन समाजात द्वेषाची भावना आणि तेढ निर्माण करण्याचे कृत्य केले, असा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला. त्यानुसार कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात कलम 505(2), 500, 501, 153 (अ) नुसार गुन्हा दाखल झाला होता. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन करत केतकीचा निषेध नोंदवला. तिला अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर केतकीला अटकही झाली. याप्रकरणी प्राथमिक पोलीस कोठडीनंतर ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर तिने जामीनासाठी अर्ज केला. त्यानुसार तिला जामीनही मंजूर झाला.

दरम्यान श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी केतकीने सोशल मिडियावर संताप व्यक्त केला होता. मेरा अब्दुल ऐसा नहीं बरोबर आहे. कारण आप मेलं, जग बुडालं. पण ३५ तुकडे होताना, गळा दाबला जाताना कुठे तरी पश्चात्ताप होत असेल ना? कुटुंबियांची आता काय मानसिक स्थिती असेल याचा विचार केल्यास अंगावर काटा येतोय. मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना डोळे उघडून पुन्हा (या वेळी कायमचे) मिटणार आहात? का आता तरी निद्रा मोडणार आहात ? !!!? #जागोमेरेदेश ।।जय हिंद।। ।। वंदेमातरम्।। ।। भारत माता की जय ।।, अशी पोस्ट केतकीने सोशल मिडियावर केली होती.