Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय योग्य की अयोग्य? बहीण सरोज पाटील यांनी स्पष्टच...

शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय योग्य की अयोग्य? बहीण सरोज पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

Subscribe

सरोज पाटील म्हणाल्या की या निर्णयामुळे मलाही धक्काच बसला, पण हा निर्णय योग्य मानून आपण शुभेच्छा दिल्या पाहिजते, असे त्यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी हा एक मोठा धक्का आहे. अनेकांनी हा निर्णय योग्य नसल्याचं म्हणत पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. आता शरद पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य यावर त्यांची बहिण सरोज पाटील यांनी स्पष्टच वक्तव्य केलं आहे. ( Sharad Pawar s retirement decision right or wrong Sister Saroj Patil told clearly )

सरोज पाटील म्हणाल्या की या निर्णयामुळे मलाही धक्काच बसला, पण हा निर्णय योग्य मानून आपण शुभेच्छा दिल्या पाहिजते, असे त्यांनी म्हटले.

- Advertisement -

मी इस्लामपूरला होते, तेव्हा जयंत पाटील यांचे कार्यकर्ते पळत आले. ते माझ्यासमोर रडायला लागले, तेव्हा मला शरद पवरा यांनी केलेल्या निवृत्तीच्या घोषणेबाबत समजले. माझ्यासाठीही हा धक्का देणाराच निर्णय होता, असे म्हणत शरद पवारांच्या निर्णयावर आपलं मत मांडलं. कोणतीही संस्था टिकायची असेल तर आपल्यानंतर तेथे सक्षम असे सेवक असायला हवेत. निस्वार्थी माणसं असली पाहिजेत. अशातच शरद पवार हे पुढील 3 वर्षे काम करु शकतील. त्यामुळे आताच त्यांनी अध्यक्ष पदावर योग्य व्यक्ती बसवली तर पुढील 3 वर्षांत तो तयार होईल. शरद बाबतचं दु:ख कमी झालं, म्हणूनच मला हा निर्णय योग्य वाटतो, असं त्या म्हणाल्या.

पवारांचा निर्णय योग्यच

शरद पवार यांनी अनेक अडचणींचा सामना केला आहे. सगळी माणसं त्यांना सोडून गेली तरी त्यांनी खंबीरपणे पक्षाची धुरा सांभाळली. कर्करोगासारख्या भयानक आजाराशी झुंजत शरद पवार आजपर्यंत जगला. कारण, माणसं हेच त्याचं औषध आहे, माणसं आली की त्याला आनंद होतो.

- Advertisement -

( हेही वाचा: नाना पटोलेंपेक्षा राहुल गांधी माझ्याशी जास्त बोलतात; राऊतांचं मोठं विधान )

आजही मला आमचं लहाणपण आठवतंय, तो लहाणपणी सतत मित्रांच्या गराड्यात असायचा. आम्ही म्हणायचो आमचा भाऊ वाया गेला, रात्री उशिरापर्यंत तो पोरांसबोतच असायचा. शाळेतील क्रीडा महोत्सवात त्याच्याशिवाय मैदानच भरत नसायचं. लहाणपणी भोपळे विकायलाही तो जायचा. खूप कष्टातून आमची ही भावंड आज इथपर्यंत पोहोचली आहेत, अशा आठवणी सरोज पाटील यांनी जागवल्या.

यांची अध्यक्षपदी निवड करावी

सरोज पाटील म्हणाल्या की राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी अजित पवार बसले तर राज्यातील बाकीची कामं कोण करणार? तसंच, सुप्रिया सुळे नको कारण तिच्या मागे कामाचा व्याप खूप आहे. तसंच, तिला घरचं बघाव लागतं त्यामुळे सुप्रिया सुळे यांना देऊ नये,असं मला वाटत. राष्ट्रवादीचे अध्यक्षपद हे जयंत पाटील यांना द्यावं, असं सरोज पाटील यावेळी म्हणाल्या

 

- Advertisment -