घरमहाराष्ट्रवाईन विक्रीच्या निर्णयावरून सरकारची माघार?

वाईन विक्रीच्या निर्णयावरून सरकारची माघार?

Subscribe

शरद पवारांच्या वक्तव्याने संभ्रम

राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. या निर्णयाविरोधात विरोधकांकडून महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याने संभ्रम निर्माण झाला आहे. हा चिंताजनक विषय आहे असे वाटत नाही. पण काहीजणांना वाटत असेल तर राज्य सरकारने वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावर वेगळा दृष्टिकोन स्वीकारला तर वावगे ठरणार नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्य सरकार वाईन विक्रीच्या निर्णयावरुन माघार घेणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. शरद पवार म्हणाले की, वाईन तसेच इतर लिकर मधील फरक जाणून घेण्याची भूमिका घेतली पाहिजे. ती जर घेतली नाही आणि त्याला विरोध असेल तर सरकारने त्या गोष्टींशी संबंधित वेगळा विचार केला तरी त्याला माझा विरोध असण्याचे कारण नाही. शरद पवार पुढे म्हणाले की, हा चिंताजनक विषय असेल असे मला वाटत नाही. पण इतर राजकारण्यांना वाटत असेल, तर राज्य सरकारने वेगळा दृष्टिकोन स्वीकारला तरी त्यामध्ये फारसे वावगे होणार नाही.

- Advertisement -

शहाणपण असेल तर निर्णय मागे घेतील- फडणवीस
वाईन विक्रीच्या निर्णयामुळे सरकारीची अब्रू चालली आहे. हे जे काही डिलिंग करुन सरकारने निर्णय घेतला तो काही मूठभर लोकांच्या फायद्याकरिता घेतला आहे. यामुळे हे सरकार उघडे पडले आहे. त्यामुळे सरकारला हा निर्णय मागे घ्यावाच लागेल हे शरद पवारांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी एकप्रकारे सरकारला हा सल्लाच दिला आहे की सुधरा. शहाणपण असेल तर निर्णय मागे घेतील. नाहीतर आम्ही तर जनतेमध्ये जातच आहोत. सर्वच स्तरातून याला प्रचंड विरोध आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र होऊ देणार नाही हा भाजपचा संकल्प आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारचा निर्णय काय आहे?
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांच्या उत्पादनात वाढ व्हावी आणि त्यांना फायदा व्हावा यासाठी हा निर्णय घेतल्याचे सत्ताधारी नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. ज्या सुपर मार्केटचे आकारमान १०००फूट आहे, त्यांनाच अशी परवानगी देण्यात येणार आहे. शैक्षणिक आणि धार्मिक स्थळांजवळ वाईन विक्री करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. राज्यातील सुपरमार्केट, वॉक इन स्टोअरमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी दिलेली आहे. वाईन विक्रीसाठी वाईन विक्री परवाना घेणे आवश्यक आहे. तसेच त्यासाठी वार्षिक 5 हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये दारुबंदी करण्यात आली आहे. त्या जिल्ह्यांमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी नसेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -