पालिकांच्या निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट व्हावं – शरद पवार

NCP Sharad Pawar
पालिकांच्या निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट व्हावं - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सोलापुरात केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्राकडून सत्तेचा दुरुपयोग होत आहे. महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट झालं पाहिजे, अशी हाक शरद पवार यांनी इतर पक्षांना दिली आहे. तसंच, एकजूट होत असताना राष्ट्रवादी पक्षाचा, कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे. जर तसं होत नसेल तर स्वतंत्र लढू, असं शरद पवार म्हणाले.

“महानगर पालिकेच्या निवडणुकीची चर्चा झाली. निवडणुका आल्या तर लक्ष घालावं लागेल. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये हवं तेवढ लक्ष दिलं नाही. त्याचा परिणाम कधी नाही तो या शहराच्या महापालिका एका अशा विचारांच्या हातामध्ये गेली. याचा परिणाम सोलापूरच्या विकासावर झाला. हे चित्र बदलायचं असेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. भाजप सोडून इतर पक्षांशी एकजूट करण्यासाठी प्रयत्न राहील. एकजूट झाली तर निवडणुकीला सामोरे जाऊ. ती एकजूट सन्मानाने झाली पाहिजे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे. सन्नाम नसेल तर आपण स्वतंत्र्य लढू. निवडणूक सोलापूरचा चेहरा बदलण्यासाठी आहे. ५० टक्के जाहगा महिलांसाठी आहेत. ५० टक्के जागा महिलांना देण्याचा निर्णय आपण देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात घेतला आहे,” असं पवार म्हणाले.

भाजपने मला ईडीची नोटीस दिली, लोकांनी येडी ठरवली

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगली फटकेबाजी केली. अजित पवार यांच्याकडे सरकारी पाहुणे आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावरुन मला नोटीस पाठवली होती. मला ईडी पाठवली पण लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे, जनता यांना धडा शिकवेल, असा हल्लाबोल शरद पवार यांनी मोदी सरकारवर केला. ते सोलापुरात राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते.

शरद पवार यांनी आयकरच्या छाप्यांवर बोलताना अजित पवार यांच्याकडे सरकारी पाहुणे आले होते. त्या पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. निवडणुकीच्या आधी मला देखील ईडीची नोटीस पाठवण्यात आली होती. ज्या बँकेचा सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली पण लोकांनी त्यांना वेडी ठरवली, अशी फटकेबाजी पवार यांनी केली.


हेही वाचा – ‘रेल्वे, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या खासगीकरणाचा घाट’; शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात

भाजपने मला ईडीची नोटीस दिली, लोकांनी त्यांना येडी ठरवली – शरद पवार