घरताज्या घडामोडी'त्या कवीचे विचार ऐकून आपण गुन्हेगार आहोत असं वाटतं', शरद पवारांकडून आठवणींना...

‘त्या कवीचे विचार ऐकून आपण गुन्हेगार आहोत असं वाटतं’, शरद पवारांकडून आठवणींना उजाळा

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी एका कवीचा उल्लेख करत त्याची कविता ऐकल्यानंतर रात्री झोप येत नसल्याचे आणि आपणच गुन्हेगार आहोत असे वाटत असल्याचे सांगितले. समाजाच्या यातना दूर करण्यासाठी समाजकारण करताना आपण काय प्रयत्न करु शकतो याचा विचार करता येतो असे शरद पवार म्हणाले. राज्यात नागरिकांसमोर अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न जाणून घेऊन त्यावर उपाय शोधून त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम केले पाहिजे असे आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात संवाद साधत होते. मुंबईतील नेहरु सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनी मोतीलाल राठोड या कवीची पाथरवट या कवितेची गोष्ट सांगितली आहे. शरद पवार म्हणाले की, काल एक कविता ऐकली, त्या कविचे नाव मोतीलाल राठोड असावं, बंजारा समाजाचा कार्यकर्ता आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  पवार कुटुंबियांना १२ डिसेंबर खास, आईसह कोणाकोणाचे वाढदिवस?, पवारांचा खुलासा


त्याला सहज विचारल काय विचार करतोय त्यावर तो म्हणाला मी तुमच्या सर्वांच्या विरुद्ध विचार करतो आहे. म्हणजे काय विचारले, त्यांनी सांगितले माझी एक लहान कविता आहे. कवितेत सांगितले की, हा मोठा दगड घेतला. त्या दगडावर आमच्या घामानं, कष्टाने हातोडा आणि छन्नीने दगडाचे मुर्तीत रुपांतर केलं. त्यानंतर सगळं गाव आले त्यापुर्वी माझ्याकडे कोणी बघत नव्हते पण सगळं गाव आले आणि गावाने वाजत गाजत मुर्ती मंदिरात स्थापन केली.

- Advertisement -

मुर्ती तुमच्या बापजाद्याचे प्रतिक आहे. पण तीचा बापजादा मी

गंमत काय तर माझ्या घामाने मुर्ती तयार केली. पंरतु मी दलित असल्यामुळे मंदिरात मला प्रवेश नाही. ही मुर्ती तुमच्या बापजाद्याचे प्रतिक आहे. पण तीचा बापजादा मी आहे. परंतु मी त्या मंदिरात जाऊ शकत नाही ती तुमची समाजरचना आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे. अशी एखादी कविता ऐकल्यावर रात्री झोप येऊ शकत नाही. आपण काही केलं असेल नसेल परंतु आपण त्या समाजाचे प्रतिनिधी आहोत. आणि त्या समाजाच्या प्रतिनिधीने या समाजावार अन्याय अत्याचार केलेत त्याची अस्वस्थता त्यांच्यामनात आहे ती दूर करण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हे ऐकल्यावर अस्वस्थता झाला तर तो खरा कार्यकर्ता त्याची बांधिलकी त्या ठिकाणी केली आहे. ठिकठिकाणी या गोष्टी ऐकायला मिळत असतात असे शरद पवार यांनी सांगितले.


हेही वाचा : वैचारिक संघर्षांमुळे मी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये जाणार होतो पण…, नवाब मलिकांनी पवारांसमोरच सांगितला तो किस्सा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -