Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Sharad Pawar : अल्पसंख्याकांसाठी चिंतेचे वातावरण, शरद पवारांचा दावा

Sharad Pawar : अल्पसंख्याकांसाठी चिंतेचे वातावरण, शरद पवारांचा दावा

Subscribe

 

मुंबईः अल्पसंख्याक विशेषतः ख्रिचन आणि मुस्लीमांना चिंता वाटावी असं वातावरण देशात आहे. मात्र हिंसा करणाऱ्यांना जनतेने नाकारलं आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मंगळवारी केले.

- Advertisement -

ख्रिचन हे शांत आहेत. त्यांचा स्वभाव अतिरेकी नाही. तरीही चर्चवर हल्ले होत आहेत. कोण आहेत हे हल्ले करणारे. काही मुस्लिम हिंसक आहेत. तसे हिंसक हिंदूंमध्येही आहेत. त्यामुळे सर्वांना एका रांगेत उभे करता येणार नाही. मुस्लीम समाजाची प्रगतीच झालेली नाही. ते शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेले आहेत याचाही विचार व्हायला हवा. देशाची प्रगती होत असताना प्रत्येक समाजाचा विचार झालाच पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले, बहुतांश राज्यांनी भाजपला नाकारलं आहे. महाराष्ट्राचा विषय आपण बाजूला ठेवू. पण गोव्यात कॉंग्रेसचे सरकार होते. जनतेने तसा कौल दिला होता. फोडाफोडीचं राजकारण करून भाजपने तेथे सत्ता आणली. अनेक राज्यांमध्ये भाजपने फोडाफोडी करून सत्ता आणली. पण कर्नाटकच्या जनतेने भाजपला नाकारलं. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या. भव्य अशा रॅली निघाल्या. मी स्वतः प्रचार बघितला. तरीही जनतेने हिंसा करणाऱ्यांना नाकारलं आहे. इंन्स्टिट्यूशनवर हल्ला करणारे जनतेला नाकोत, असेही शरद पवार यांनी सांगितलं.

भाजपला विरोधकांची भीती

- Advertisement -

भाजप सरकारला विरोधकांची भीती आहे. विरोधक एकत्र येऊन जनतेला पर्याय देऊ शकतात हे भाजपला कळलं आहे. त्यामुळे विरोधकांनी घाबरण्याचं कारण नाही. जे होणार ते चांगलच होणार आहे. हिंसा करणारे जनतेला नको आहेत. त्यामुळे आपण जागरुक राहायला हवे, असा सल्ला शरद पवार यांनी विरोधकांना दिला.

मराठवाडा नामांतराची सांगितली आठवण

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची घोषणा केली आणि तेथून निघाल्यावर लगेच हिंसाचार झाला. हे का झालं, कारण आम्ही लोकांच ऐकलं नव्हतं. आम्ही परत तेथे गेलो. लोकांची मत जाणून घेतली. त्यांना विश्वासात घेतलं. पुढे जाऊन अनेकांनी आम्हाला मदत केली. विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं. लोकांचं ऐकल्यानंतरच नामांतरला पाठिंबा मिळाला, अशी आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली.

‘आपली लोकशाही मूल्ये अपमानित झाली’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. एकीकडे मोठ्या जल्लोषात नवीन संसद भवनाचे उद्धाटन सुरू होते, तर दुसरीकडे आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंची पोलिसांकडून धरपकड सुरू होती. शरद पवार यांनी दिल्ली पोलिसांवर हल्लाबोल केला होता. ‘लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी न्याय मागत असलेल्या महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या देशाची शान असलेल्या कुस्तीपटूंना अशाप्रकारे वर्तणूक देणे आणि ताब्यात घेणे अत्यंत निषेधार्ह आहे. दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. या क्रूरतेच्या कृत्याने आज आपली लोकशाही मूल्ये अपमानित झाली आहेत, अशी टीका शरद पवार यांनी केली होती.

- Advertisment -