Eco friendly bappa Competition
घर क्राइम Sharad Pawar, Sanjay Raut धमकी : गुन्हा दाखल, दोघेजण ताब्यात; पोलीस Action...

Sharad Pawar, Sanjay Raut धमकी : गुन्हा दाखल, दोघेजण ताब्यात; पोलीस Action मोडवर

Subscribe

 

मुंबईः Sharad Pawar, Sanjay Raut राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा नोंदवला. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या दोघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्रातील दोन बड्या राजकीय नेत्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने पोलीस Action मोडवर आली आहे.

- Advertisement -

हेही वाचाः धमक्या दिल्या तरी आवाज बंद होणार नाही, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून पोलिसांत तक्रार करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी नर्मदाबाई पटवर्धन आणि सौरभ पिंपाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. IPC कलम 153 A, 504, 506(2) अंतर्गत पोलिसांना हा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई गुन्हे शाखा याचा पुढील तपास करत आहे.

- Advertisement -

हेही वाचाःThreat to Sharad Pawar : शरद पवारांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. हे दोघेही गोवंडीचे आहेत. त्यांनी नशेत ही धमकी दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोणी तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे त्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलीस स्वतःच याचा गुन्हा दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे. सजंय राऊत यांचा भाऊ आमदार सुनील राऊत यांनाही धमकी मिळाली आहे.

शरद पवार धमकी

शरद पवार यांना धमकी आल्याची तक्रार खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांत दिली. त्यानंतर खासदार सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज सकाळी त्यांच्या व्हॉट्सअपवर मेसेज आला. एका वेबसाईटच्या माध्यमातून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामध्ये “लवकरच तुमचा दाभोलकर होणार…” असे लिहिण्यात आले आहे. तर या मॅसेजवर अनेकांच्या कमेंटदेखील आहेत. त्यामुळे आता या प्रकरणी गृह खात्याने तातडीने दखल घेत कडक कारवाई करावी. असेही यावेळी सुप्रिया सुळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. हा विषय मुंबईच्या सीपींना सांगण्यात आला असून ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, असेही त्या म्हणाल्या. राजकारणात मतभेद असतात. पण इतका द्वेष पसरणे हे दुर्दैवी आहे. शरद पवारांना मिळालेल्या धमकीचा सखोल तपास केला पाहिजे. महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे. मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. भविष्यात काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार देशाचे आणि राज्याच्या गृहमंत्री जबाबदार आहे, असेही सुप्रिया सुळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर तक्रारीची दखल करत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संजय राऊत धमकी

संजय राऊत यांच्यासह त्याचे लहान भाऊ सुनील राऊत यांनासुद्धा धमकी देण्यात आली आहे. 9 वाजताचा भोंगा बंद करा, अन्याथा गोळ्या घालू अशी धमकी देण्यात आली आहे. काल चार सव्वाचार वाजता तीन ते चार फोन माझ्या मोबाईलवर आले. फोनवर बोलणाऱ्या माणसाने मला आणि संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिली. महिनाभरामध्ये तुम्हाला आणि तुमच्या भावाला गोळ्या घालून स्मशानात पाठवून देईल. तुम्ही संजय राऊत यांना सांगा सकाळची जी पत्रकार परिषद होते ती बंद करायला सांगा नाहीतर तुम्हाला आणि तुमच्या भावाला संपवून टाकू, अशी धमकी दिल्याची माहीत सुनील राऊत यांनी दिली.

 

- Advertisment -