घरमहाराष्ट्रप्रकृतीची चिंता न करता पवार साताऱ्यात; 'साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच राखणार'

प्रकृतीची चिंता न करता पवार साताऱ्यात; ‘साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच राखणार’

Subscribe

साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच राखणार असा दावा शरद पवार यांनी केला आहे.

सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केल्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या प्रकृतीची चिंता न करता ताबोडतोब रात्री साताऱ्यात दाखल झाले. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या ताकदीला सुरुंग न लागावा, अशी चिंता पवार यांना आहे. त्यामुळे बुधवारी रात्री उशिराने साताऱ्यातील विश्रामगृहावर दाखल झाले. तिथे त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील भाजपात प्रवेश केला. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पक्षांतरानंतर साताऱ्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. दरम्यान, गुरुवारी साताऱ्यातील विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी ‘साताऱ्याची जागा राषट्रवादीच राखणार’, असा दावा केला आहे.

हेही वाचा – ‘अफजल खान व्यक्ती नाही तर प्रवृत्ती’; कोल्हेंची भाजपला अफजल खानाची उपमा

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान साताऱ्याचे बडे नेते आणि सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी देखील बुधवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी साताऱ्यात जावून तेथील स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि गुरुवारी साताऱ्यातील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.

- Advertisement -

‘साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच राखणार’

तीन नेत्यांनी पक्षात प्रवेश केला म्हणजे मेगाभरती होत नाही, असा टोला शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भाजपला लगावला. साताऱ्याची राष्ट्रवादीच राखेल, असे पवार म्हणाले. यावेळी पक्षांतर करणाऱ्यांविषयी भाष्य केले. विरोधी आमदारांना धमकावले जात आहे. त्यांना धमकावून आणि आमिष दाखवून पक्ष प्रवेशाचा दबाव आणला जात आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला. त्याचबरोबर शरद पवार म्हणाले की, सत्ताधाऱ्यांच्या दबावाला कंटाळून काही लोकांनी भाजपात प्रवेश केला. परंतु, सत्ता नसतानाही कामे करता येऊ शकतात. पण सत्ताधाऱ्यांना तोंड देता येऊ शकत नाही म्हणून काहीजण भाजपात गेले. मात्र, तरिही साताऱ्याची जागा आम्हीच राखू. या जागेसाठी माझ्याजवळ तीन अर्ज आले आहेत. उमेदवारी कुणाला द्यायची याविषयावर चर्चा सुरु आहे. उद्या उदयनराजे भोसले येणार आहेत. या जागेसाठी राजघराण्यातील उमेदवार देता येईल का? याविषयी त्यांच्याशी चर्चा होईल. त्यानंतर उमेदवार निश्चित करु. मात्र साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच जिंकणार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -