Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रSharad Pawar : ईव्हीएमविरोधात घेणार कोर्टात धाव; शरद पवार गटाचं ठरलं

Sharad Pawar : ईव्हीएमविरोधात घेणार कोर्टात धाव; शरद पवार गटाचं ठरलं

Subscribe

आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटाची तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटातील पराभूत आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनी विधानसभेच्या निकालावर संशय व्यक्त केला आहे. यानंतर आता पक्षप्रमुखांनी देखील ही बाब गांभीर्याने घेत ठोस भूमिका घेण्याचे ठरवले असून आता ईव्हीएमविरोधात कोर्टात धाव घेणार असल्याचे त्यांचं ठरलं आहे.

मुंबई : राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला असून राज्यात पुन्हा एकदा बहुमताने महायुतीचे सरकार आले आहे. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. महाविकास आघाडी ईव्हीएमविरोधातील भूमिकेवर एकमताने ठाम असून पुढे जात असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटाची तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटातील पराभूत आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनी विधानसभेच्या निकालावर तसेच ईव्हीएमच्या टक्केवारीवर संशय व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे. यानंतर आता पक्षप्रमुखांनी देखील ही बाब गांभीर्याने घेत ठोस भूमिका घेण्याचे ठरवले असून आता ईव्हीएमविरोधात कोर्टात धाव घेणार असल्याचे त्यांचे ठरलं आहे. (sharad pawar decision legal fight against evm.)

हेही वाचा : Maharashtra CM : मुख्यमंत्रिपद सोडा अन् केंद्रात या, अन्यथा…; भाजपाकडून शिंदेंना दोन पर्याय

- Advertisement -

सध्या विरोधक ईव्हीएमविरोधातील लढाईसाठी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत 1 लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी देखील ईव्हीएमला विरोध केल्याचे पाहायला मिळत आहे. तर शरद पवार आणि उद्धव ठकारे यांनी ईव्हीएमविरोधात आंदोलन उभे करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा : Amol Mitkari : नरेश अरोरांनी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवल्यानं अमोल मिटकरी भडकले; म्हणाले, “हा महाराष्ट्र…”

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत उमेदवारांनी केलेल्या तक्रारीनंतर एक वकिलांची टीम करण्याचा निर्णय पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी घेतला आहे. राज्यपातळीवर एक आणि केंद्रीय पातळीवर एक कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठित करण्याचा निर्णय शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच शरद पवारांकडून केवळ आरोप करण्यापेक्षा ईव्हीएमबाबत जे आक्षेप आहेत किंवा निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या ते सर्व पुरावे गोळा करण्याच्या सूचना देखील उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांना 28 तारखेपर्यंत व्हीव्हीपॅट तपासणीसाठी वेळ असल्याने उमेदवारांनी तत्काळ व्हीव्हीपॅट तपासणी करावी अशीही सूचना सर्वच पराभूत उमेदवारांना बैठकीत करण्यात आली आहे. तसेच राज्य पातळीवर ज्या प्रकारे या लढाईला सुरुवात झाली, तशीच लढाई इंडिया आघाडी देखील लढणार असल्याची माहिती शरद पवारांनी यावेळी उमेदवारांना दिली आहे.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -