Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रSharad Pawar : पैशांद्वारे निवडणूक यंत्रणा हाती घेतली; पवारांचा आरोप

Sharad Pawar : पैशांद्वारे निवडणूक यंत्रणा हाती घेतली; पवारांचा आरोप

Subscribe

संसदीय लोकशाही पद्धती उद्धवस्त होईल अशी भिती लोकांच्या मनात असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत. तसेच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर करण्यात आला. पैशांद्वारे निवडणूक यंत्रणा हाती घेतल्याचा आरोप देखील यावेळी शरद पवारांनी केला आहे

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे पुण्यातील फुले वाड्यात आत्मक्लेश उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनस्थळी जात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आढावा यांची भेट घेतली. यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. शरद पवार यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे. तसेच त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. संसदीय लोकशाही पद्धती उद्धवस्त होईल अशी भिती लोकांच्या मनात असल्याचे यावेळी ते म्हणाले आहेत. तसेच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर करण्यात आला. पैशांद्वारे निवडणूक यंत्रणा हाती घेतल्याचा आरोप देखील यावेळी शरद पवारांनी केला आहे. (Sharad Pawar On Mahayuti.)

हेही वाचा : Ekikaran Samiti Melava : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाही; पोलिसांचे आदेश

- Advertisement -

तसेच संसदीय लोकशाही पद्धती उद्धवस्त होईल अशी भिती लोकांच्या मनात असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले आहे. निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर करण्यात आला असून पैशांचा महापूर वाहत होता. याआधी निवडणुकीत असा सत्तेचा गैरवापर कधीच पाहिला नसल्याचे यावेळी ते म्हणाले आहेत. त्यामुळे राज्यातील लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. आताच्या सरकार पैशांच्या जोरावर निवडणूक यंत्रणा हाती घेतली आहे. संसदीय लोकशाही पद्धतीवरच या राज्यकर्त्यांचा आघात होत असल्याचे देखील ते म्हणाले. तसेच संसदेमध्ये विरोधकांना बोलू दिले जात नसल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिला आहे.

हेही वाचा : Air Pollution : वरळी, माटुंग्यातील 8 बांधकामे बंद; पालिका प्रशासनाची कारवाई, प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले

- Advertisement -

मतदानाच्या शेवटच्या दोन तासातील टक्केवारी धक्कादायक असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. तसेच ईव्हीएम हॅक होऊ शकतं यांचे काहींनी प्रेझेटेंशन दिले. पण आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला आहे. मात्र निवडणूक आयोग इतकी चुकीची भूमिका घेईल असे कधीच वाटलं नव्हतं. तसेच यापूर्वी असे कधीच घडले नाही, असे शरद पवारांनी सांगितले आहे.

यावेळी ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप बाबा आढाव यांनी केला आहे. निवडणुकीमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण करण्यात आले, असेही आढाव म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीचा निर्णय वेगळा आणि लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा कसा लागू शकतो असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. ईव्हीएम आणि पैशांच्या वापरामुळे हा निकाल आला आहे. या निवडणुकीत सतत मतदानाची टक्केवारी बदलत गेल्याचे आढाव यांनी सांगितले आहे. तसेच आपण तीन दिवस आत्मक्लेश आंदोलन करणार आहोत असेही त्यांनी सांगितले आहे. तसेच गौतम अदानींवर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. आदानींच्या विरोधात लोकसभेत बोलू दिले जात नसल्याचे देखील ते यावेळी म्हणाले आहेत. या सरकारच्या विरोधात मी सत्याग्रह करणार आहे, असे बाबा आढाव यांनी यावेळी सांगितले आहे.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -