घरठाणेशरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा, ठाण्यात कार्यकर्त्यांचे उपोषण

शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा, ठाण्यात कार्यकर्त्यांचे उपोषण

Subscribe

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे राज्याच्या राजकारण एकच खळबळ उडाली आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्तेही या निर्णय व्यथित झाले असून त्यांनी ठाणे पक्ष कार्यालयासमोर बसून उपोषण सुरू केले आहे.

शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेत घोषणा केली. त्यानंतर ठाण्यातही पडसाद उमटले. ठाण्यातील कार्यकर्त्यांनी पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी चक्क आत्मक्लेश आंदोलनाचा मार्ग अनुसरला. पक्ष कार्यालयासमोर अनेक कार्यकर्ते चक्क उपोषणाला बसले. या उपोषणात महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, शहर सरचिटणीस रवींद्र पालव, आदी सहभागी झाले होते.

- Advertisement -

निवृत्तीच्या निर्णयाचा शरद पवार दोन-तीन दिवसांत फेरविचार करणार – अजित पवार

विद्या चव्हाण, वंदना चव्हाण, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, रोहित पवार, चेतन तुपे, प्रुफल्ल पटेल, अशोक पवार, शेखर निकम आणि जितेंद्र आव्हाड हे सर्वजण सिल्व्हर ओकवर दाखल झाले होते. फेरविचार करण्याबाबत आम्ही शरद पवार यांच्याशी चर्चा केली. परंतु या चर्चेनंतर त्यांनी कार्यकर्त्यांना निरोप देण्यास सांगितला. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मला फेरविचार करण्यास दोन ते तीन दिवस लागतील, असं शरद पवारांनी सांगितल्याचं, अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

पवारांचा हा वैयक्तिक निर्णय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मला याबाबत काहीही कल्पना नाही. परंतु हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. यावेळी त्यावर काही बोलणं मला योग्य वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे. यावर मला आता काहीही भाष्य करायचं नाहीये. मात्र, या संपूर्ण परिस्थितीवर आमचं लक्ष आहे. त्यामुळे योग्य वेळ आम्ही त्यावर भाष्य करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -