St worker silver oak: सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण, एसटी कर्मचाऱ्यांवर अनिल परब यांचे कारवाईचे संकेत

ST Worker strike anil parab appeal ST workers should return to work by March 10

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घरावर हल्ला करण्याचा प्रकार दुर्दैवी आणि निंदनीय आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत चौकशी करूनच संपूर्ण निष्कर्ष काढले जातील, असेही अनिल परब म्हणाले. या प्रकरणात चौकशी होईल, चौकशीअंती कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनाही कामावर रूजू होण्यासाठीचे आवाहन त्यांनी केले.

कायदा हातात घेऊन सगळ्यांचेच नुकसान होईल, त्यामुळे कोर्टाच्या आदेशाचे पालन करा. आम्हीदेखील वारंवार आवाहन करत, कारवाई मागे घेतली होती. माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेल्या निर्णयाचा आदर राखत एसटी सुरळीतपणे सुरू करावी, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आज केले. शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर झालेल्या हल्ल्याची संपूर्णपणे चौकशी होईल, तसेच या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. असा प्रकार दुर्दैवी आणि निंदनीय आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत चौकशी करूनच संपूर्ण निष्कर्ष काढले जातील, असेही अनिल परब म्हणाले. या प्रकरणात चौकशी होईल, चौकशीअंती कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सदावर्ते की कोर्ट कोणाच एकायचे ते कर्मचाऱ्यांनी ठरवावे

राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही विषय नाही. जे कोणी माथी भडकवली जात असतील तर त्याचा योग्य उपचार केला गेला पाहिजे. गृहमंत्रालय यावर योग्य ती कारवाई करेल, असेही ते म्हणाले. गेली पाच महिने एसटी तोट्यात असतानाही, अतातायी पावले उचलली नाहीत. अशा परिस्थितीत मेस्मा कायदा लावला जातो. पण आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सहानभूतीपूर्वकच विचार केला. आम्ही त्यांचा पगार वाढवला. आम्ही त्यांच्याशी चर्चा करायलाही तयार होतो. पण जनतेला वेठीस धरून संप करणे हे योग्य नाही, अशी भूमिका आम्ही सुरूवातीलाच मांडली होती. म्हणूनच कामगारांनी कामावर रूजू होणे हे त्यामागचे उत्तर आहे. गुणरत्न सदावर्ते आणि कोर्ट यांच्यापैकी कोणाचे एकायचे आहे, हे आता कर्मचाऱ्यांनी ठरवाव, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले.


ST Workers Strike: शरद पवारांचे वाईट दिवस सुरू झालेत – अनिल बोंडे