भाजपने मला ईडीची नोटीस दिली, लोकांनी त्यांना येडी ठरवली – शरद पवार

NCP President Sharad Pawar

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगली फटकेबाजी केली. अजित पवार यांच्याकडे सरकारी पाहुणे आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावरुन मला नोटीस पाठवली होती. मला ईडी पाठवली पण लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे, जनता यांना धडा शिकवेल, असा हल्लाबोल शरद पवार यांनी मोदी सरकारवर केला. ते सोलापुरात राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते.

शरद पवार यांनी आयकरच्या छाप्यांवर बोलताना अजित पवार यांच्याकडे सरकारी पाहुणे आले होते. त्या पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. निवडणुकीच्या आधी मला देखील ईडीची नोटीस पाठवण्यात आली होती. ज्या बँकेचा सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली पण लोकांनी त्यांना वेडी ठरवली, अशी फटकेबाजी पवार यांनी केली.

इंधन दरवाढीवरुन शरद पवारांचा निशाणा

“आज सामान्य नागरिकांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा महागाईचा प्रश्न आहे. एक दिवस असा जात नाही की आज पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले नाही. याचा अर्थ ज्यांच्याकडे मोटार आहेत त्यांनाच त्रास होतो असं नाही. तर दळणवळणाची साधणं यावर देखील त्याचा परिणाम होतो आणि परिणामी महागाी वाढते. आजचं सरकार भाजपचं आहे. ज्यांची आर्थक निती महागाईला निमंत्रण देण्याची निती आहे. त्यामुळे सामान्य माणसाला संसार करणं अवघड झालं आहे. पूर्ण जबाबदारी भाजप सरकारवर आहे. त्यासाठी या लोकांच्या विरोधात जनमानस तयार करण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षाला घ्यायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ही मनस्थिती घेऊन आपल्याला या ठिकाणी काम करावं लागेल,” असं पवार म्हणाले.

महाराष्ट्र बंदला शांततेत सहभागी व्हा

“हा देशी शेती प्रधान आहे. आज ६० टक्के शेती करतात. ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे त्यांची शेतकरी आणि शेती व्यवस्थांबद्दलची भूमिका काय? शेतकऱ्याबद्दल आस्था नाही. उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे शेतकरी रस्त्यावर आले तर त्यांना चिरडून टाकलं. तुमच्या हातामध्ये सत्ता लोकांनी दिली ती या सगळ्या लोकांचं भलं करण्यासाठी दिली. त्याचं विस्मरण भाजप सरकारला झालं आहे. भाजप सरकारने त्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून त्यांची हत्या करण्याचा पाप केलं. साहजीकच याचा संताप संपूर्ण देशमाध्ये आहे. महाराष्ट्रातल्या भाजप सोडून सगळ्या पक्षांनी हा निर्णय घेतला. शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी उद्याच्या ११ तारखेला सबंध महाराष्ट्र बंद ठेवायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याची काळजी घ्या,” असं आवाहन पवार यांनी केली.


हेही वाचा – ‘रेल्वे, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या खासगीकरणाचा घाट’; शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात