Sharad Pawar : शरद पवारांची टोलेबाजी, म्हणाले पुण्यात गिरीश बापट कुठेही उभे राहतात अन..

MP Sharad Pawar criticized BJP
MP Sharad Pawar criticized BJP

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान भाजपवर टोलेबाजी केली आहे. पुण्याची चर्चा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी होत असते. तसेच शरद पवार यांनीसुद्धा पुण्यातील अनुभव घेतला असून त्यांनी असाच एक अनुभव सांगताना भाजप नेत्यांवर टीका केली आहे. भाजप नेते गिरीश बापट कुठेही उभे राहतात आणि निवडून येतात लक्षातच येत नाही. पुण्यात कोणी काय सांगेल याचा भरवसा नाही असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार पुण्यात अंकुश काकडे यांनी लिहिलेल्या हॅशटॅग पुणे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी शरद पवारांनी संवाद साधला ते म्हणाले की, पुण्यात शिकत असताना महापालिकेत काय काम चालतं हे माहिती होत, नगरसेवकांशी माझा संपर्क असायचा,गिरीश बापट, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला यांची मैत्री महापालिकेत प्रसिध्द आहे. अनेक वेळा अनेक जागा पुण्यात आम्ही जिंकल्या. पण मला अजून लक्षात आले नाही, गिरीश बापट कोठेही उभे राहतात अन् विजयी होतात. एकदा बापट कसब्यातून उभे राहिले, आम्ही ठरवलं यांच्यावर लक्ष ठेवायचं, पण ते काय आम्हाला शक्य झालं नाही असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

दरम्यान पुस्तकावरुन शरद पवार म्हणाले की, आता हे पुस्तक पाहिल्यावर याच कारण बापट, अंकुश आणि शांतीलाल यांची मैत्री आहे की काय? असा संबध आहे का? हे मला तपासावे लागेल अशी कोपरखळी सुद्धा पवरांनी लगावली आहे.

आजच्या पुण्यात फार मोठा बदल

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील बदलत्या घडामोडींवरसुद्धा लक्ष वेधले आहे. शरद पवार म्हणाले त्या काळातील पुणे आणि आताचे पुणे यामध्ये फार मोठा बदल झाला आहे. आता पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांची लोकसंख्या जवळपास ७० लाख आहे. एवढ्या लोकसंख्येचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. तसेच पुण्यात छोटे-मोठे असे १ कोटीपेक्षा जास्त कारखाने आहेत. शैक्षणिक हब तसेच रोजगार उपलब्ध करुन देणारे असे पुणे महत्त्वाचे शहर असल्याचे शरद पवार म्हणाले.


हेही वाचा : राणा दाम्पत्याला मिडीयाला बाईट देणं पडणार महाग, जामीन होणार रद्द