घरताज्या घडामोडीWrestlers Protest : 'आज आपली लोकशाही मूल्ये अपमानित झाली...', शरद पवारांची दिल्ली...

Wrestlers Protest : ‘आज आपली लोकशाही मूल्ये अपमानित झाली…’, शरद पवारांची दिल्ली पोलिसांवर नाराजी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. एकीकडे मोठ्या जल्लोषात नवीन संसद भवनाचे उद्धाटन सुरू होते, तर दुसरीकडे आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंची पोलिसांकडून धरपकड सुरू होती. विनेश फोगाट, संगीता फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (Sharad Pawar Slams Central Government As Delhi Police Detains Wrestlers)

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्ली पोलिसांवर हल्लाबोल केला आहे. ‘आपल्या देशाची शान असलेल्या कुस्तीपटूंना अशाप्रकारे वर्तणूक देणे आणि ताब्यात घेणे अत्यंत निषेधार्ह आहे. दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो’, अशा शब्दांत पवारांनी दिल्ली पोलिसांवर नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

रविवारी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलंनाविरोधातपोलिसांनी कडक कारवाई केली. धरणे आंदोलन करत असलेल्या पैलवान मुली आणि पोलिसांमध्ये मोठी धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलन करणाऱ्या पैलवानांनी बॅरिकेड्स तोडून नवीन संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी विनेश फोगाट, संगीता फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पोलिसांनी जंतर-मंतर येथील धरणे आंदोलनाचा मंडप आणि खुर्च्या हटवल्या आहेत. या सगळ्या घटनेनंतर शरद पवार यांनी ट्विटरवरून दिल्ली पोलिसांवर निशाणा साधला.

- Advertisement -

काय म्हणाले शरद पवार?

“लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी न्याय मागत असलेल्या महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या देशाची शान असलेल्या कुस्तीपटूंना अशाप्रकारे वर्तणूक देणे आणि ताब्यात घेणे अत्यंत निषेधार्ह आहे. दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. या क्रूरतेच्या कृत्याने आज आपली लोकशाही मूल्ये अपमानित झाली आहेत”, अशा शब्दांत शरद पवार यांनी दिल्ली पोलिसांवर नाराजी व्यक्त केली.

नविन संसद भवनासमोर नेमकं काय घडलं?

कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनाकडे कूच केल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी १०९ जणांना ताब्यात घेतलं होतं. संपूर्ण दिल्लीमधून पोलिसांनी ८०० जणांना ताब्यात घेतले.

दरम्यान, पैलवानांचे आंदोलन सरकारने कशा पद्धतीने चिरले याची माहिती साक्षी मलिकने ट्विट करुन दिली आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. बृजभूषणवर तत्काळ कारवाई करावी यासाठी कित्येक दिवसांपासून भारताच्या महिला कुस्तीपटू या जंतर-मंतर येथे धरणे देत होत्या. त्यांचे आंदोलन आज चिरडण्यात आले आहे.


हेही वाचा – महिला कुस्तीपटूंचे आंदोलन पोलिसांनी चिरडले, संसद लोकार्पण सोहळ्यावेळी दिल्लीत राडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -