Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE राज्यपालांचे ज्ञान ऑक्सफोर्डपेक्षा भारी; शरद पवारांचा कोश्यारींना टोला

राज्यपालांचे ज्ञान ऑक्सफोर्डपेक्षा भारी; शरद पवारांचा कोश्यारींना टोला

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसांपासून कोकणातील निसर्ग वादळाने नुकसान झालेल्या ठिकाणी भेट देऊन नुकसानग्रस्तांना दिलासा देत आहेत. आज त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याला भेट दिली यावेळी त्यांनी राज्यपालांवर विद्यापीठाच्या अंतिम परिक्षेच्या मुद्द्यावर टीका केली. राज्य सरकारने विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यपालांनी सरकारला पत्र लिहून याचे कारण विचारले होते. तसेच भाजपनेही या निर्णयाचा विरोध केला होता. यासंबंधी शरद पवारांना आज प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि आयआयटीने देखील परिक्षा रद्द केल्या असल्याकडे लक्ष वेधले. तसेच राज्यपालांचे ज्ञान ऑक्सफोर्डपेक्षा अधिक असल्याचा टोलाही शरद पवारांनी लगावला.

शरद पवार यांनी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली होती. दोन दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी पाहणी केल्यानंतर शेतकरी, मच्छिमार आणि इतर सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करावे, असे आदेश सरकारला दिले. यावेळी शरद पवार म्हणाले की, यंत्रणा अजून सगळीकडे पोहोचलेली नाही, असे प्रशासनातील अधिकारी सांगत आहेत. कोकणातील नारळ, सुपारी बागांची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेती, घरांची पडझड झालेल्यांना मदत करावी, असे सरकारला सूचवणार असल्याचे ते म्हणाले होते.

- Advertisement -

तसेच कोरोनाग्रस्तांना जी अन्नधान्याची मदत केली होती, त्याचे चक्रीवादळामुळे नुकसान झाले असून नागरिकांना तात्काळ रॉकेल, तांदूळ, गहू, डाळीचे वाटप करावे, अशा सूचना शरद पवारांनी प्रशासनाला केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्याही निदर्शनास काही गोष्टी आणून देणार असल्याचे सांगितले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -