घरमहाराष्ट्रतर या सरकारला थोबाडही दाखवता येणार नाही - शरद पवार

तर या सरकारला थोबाडही दाखवता येणार नाही – शरद पवार

Subscribe

नांदेडमध्ये झालेल्या महाआघाडीच्या पहिल्या वहिल्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड शब्दांमध्ये टीका केली.

नांदेडमध्ये बुधवारी झालेल्या महाआघाडीच्या महासभेमध्ये शरद पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपप्रणीत सरकारवर परखड टीका करत येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठीचा शंखनाद केला. राफेल विमान करारावरून बोलताना पवारांनी ‘जर राफेल करारात झालेला भ्रष्टाचार उघड झाला, तर या सरकारला कुठे थोबाड दाखवायची देखील स्थिती उरणार नाही’, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

‘राफेलचं भूत सरकारला गाडणार’

यावेळी पवारांनी मनमोहन सिंग सरकारने केलेल्या व्यवहाराचा दाखला दिला. ‘संरक्षण खात्याचं काम आम्ही पाहिलंय. पण मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ५०० कोटी असलेल्या विमानांची किंमत मोदींच्या राजवटीमध्ये १६०० कोटी झाली. हे ५०० कोटी कुणाच्या खिशात गेले? आता हे कोर्टाची कारणं देत आहेत. पण हे राफेलचं भूत या सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही. देशाच्या संरक्षणासाठी घेतलेल्या हत्यारांमध्ये झालेला भ्रष्टाचार जेव्हा सिद्ध होईल, तेव्हा या देशाच्या सरकारला देशात थोबाड सुद्धा दाखवायची स्थिती राहणार नाही’, असं यावेळी शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, पुलवामा हल्ला प्रकरणावरून देखील पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ‘पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं. त्या बैठकीला सर्व नेते हजर होते. पण त्या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर नव्हते. भाजपचेही कोणतेही नेते हजर नव्हते. सत्ताधारी पक्षाचा एकही प्रतिनिधी त्या बैठकीला नव्हता. आम्ही सगळे सरकारसोबत आहोत हा विश्वास आम्ही सरकारला दिला. आम्ही तिथे चर्चा करत होतो आणि पंतप्रधान धुळ्यात येऊन भाषणं करत होते’, असं ते म्हणाले.

‘महत्त्वाच्या संस्था उद्ध्वस्त होत आहेत’

देशातल्या महत्त्वाच्या संस्था उद्ध्वस्त करण्याचं काम मोदी सरकार करत असल्याचा आरोप यावेळी शरद पवारांनी लगावला. ‘सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सांगतात की न्यायदानामध्ये हस्तक्षेप वाढलाय. न्यायसंस्था उद्ध्वस्त झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनाही ६ महिन्यांत राजीनामा द्यावा लागला. त्यांनी सांगितलं की इथं काम करणं कठीण आहे. त्यामुळे देशातल्या महत्त्वाच्या संस्थाच उद्ध्वस्त होत आहेत’, असं पवार यावेळी बोलताना म्हणाले.

- Advertisement -

#Live : महाआघाडीने प्रचाराचं रणशिंग फुंकल

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, February 20, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -