घरताज्या घडामोडीपोलिसांना सक्तीची भूमिका घ्यावीच लागेल - शरद पवार

पोलिसांना सक्तीची भूमिका घ्यावीच लागेल – शरद पवार

Subscribe

लॉकडाऊननंतर देखील घराबाहेर फिरणाऱ्यांना सक्ती करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक किंवा वादावादी करण्याचे प्रकार समोर आले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भूमिका मांडली आहे.

‘सरकार आणि प्रशासनाकडून वारंवार आवाहन करून देखील अजूनही अनेक लोकं नियम पायदळी तुडवून अनावश्यक
गोष्टींसाठी घराबाहेर पडत आहेत. अशा वेळी पोलिसांनी सक्तीची भूमिका घेतली, तर त्यांच्यावर टीका होते. पण पोलिसांना सक्तीची भूमिका घेण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यांना तशी भूमिका घ्यावीच लागेल’, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शरद पवार यांनी लोकांशी तिसऱ्यांदा संवाद केला. ‘पोलिसांवर काही ठिकाणी हल्ले होण्याचे, त्यांच्यावर दगडफेक होण्याचे, त्यांच्याशी वाद घालण्याचे प्रकार समोर आले आहेत. असं करणं चुकीचं आहे. पोलीस देखील माणूसच असून आपल्या सुरक्षेसाठीच ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे त्यांना लोकांनी सहकार्य करणं आवश्यक आहे’, असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.

तबलिगीचा कार्यक्रम टाळता आला असता…

दरम्यान, यावेळी शरद पवारांनी दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या कार्यक्रमावर देखील भूमिका मांडली आहे. ‘तबलिगमधल्या लोकांनी देशात अनेक ठिकाणी प्रवास केला. त्यातून हा रोग अधिक फैलावण्याची शक्यता आहे. समारंभांचं औचित्य समजू शकतो. पण आजची परिस्थिती पाहून नियम पाळले गेलेच पाहिजे. तबलिगीचा समारोह टाळण्याची आवश्यकता होती. तो टाळता आला असता. पण तो टाळला गेला नाही’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

‘तबलिगीसारखा प्रकार पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या’

‘येणाऱ्या काळात ८ एप्रिल रोजी मुस्लीम बांधवांचा हयात नसलेल्या व्यक्तींचं स्मरण करण्याचा एक समारंभ आहे. तसेच, १४ एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देखील आहे. हा समारंभ आपण दीड ते दोन महिन्यांसाठी साजरा करतो. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये तो पुढे ढकलता येईल का? याची चाचपणी संबंधितांनी करायला हवी. शिवाय इथून पुढे तबलिगीसारखा प्रकार पुन्हा होणार नाही, याची देखील काळजी सगळ्यांनी घ्यायची गरज आहे’, असं शरद पवारांनी यावेळी नमूद केलं.

राज्यात ३१४३ अधिक रिलीफ कॅम्प

‘लॉकडाऊनमुळे रस्त्यावर आलेल्या कामगार, मजुरांसाठी राज्य सरकारने ३ हजार १४३ रिलीफ कॅम्पची सोय केली असून त्यामध्ये ३ लाख ३२ हजार २६६ लोकांची सोय करण्यात आली आहे. १७२१ लेबर कॅम्प आहेत. या कॅम्पमध्ये २ लाख ४९ हजार ३९९ लोकांची निवास, अन्न आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. साखर कारखान्यांच्या मदतीने २८ कॅम्प काढले आहेत. २८७५ मजूर तिथे आहत. पाटबंधाऱ्याच्या खात्याचेही थेट साईटवर ५७७ कॅम्प आहेत. तिथे १५ हजार ३२३ मजुरांची सोय केली आहे’, अशी माहिती शरद पवारांनी दिली.


Corona Update – भावाला वाचवलं नाही म्हणून कोरोना रुग्णाने केला डॉक्टरांवर हल्ला
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -