घरमहाराष्ट्रकाँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशच्या जमीनदारासारखी - शरद पवार

काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशच्या जमीनदारासारखी – शरद पवार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसच्या (Congress) सद्यस्थितीवर परखड शब्दात भाष्य केलं आहे. आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशमधील एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे, असं परखड मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. तशीच काहीशी अवस्था आजच्या काँग्रेसची झाली आहे, असं शरद पवार म्हणाले. ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलं आहे.

लोकसभेची निवडणूक २०२४ मध्ये होणार असून यासाठी पंतप्रधानपदासाठी विरोधकांकडून चेहरा शोधला जात आहे. यासाठी देखील विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचा चेहरा होऊ शकतात, असं सांगतात. यावर शरद पवार यांनी भाष्य करताना स्पष्ट शब्दांत काँग्रेसला सुनावलं. काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

शरद पवार यांना पुढे काँग्रेसच्या नेतेमंडळींमध्ये अहंकाराची भावना आहे का असं विचारला असता त्यांनी उत्तर प्रदेशमधील जमीनदाराचं उदाहरण दिलं. मागे मी एक गोष्ट सांगितली होती. उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. पण त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनीची आता १५-२० एकरवर आली आहे. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही, असं शरद पवार म्हणाले.

यावरच पवारांना म्हणजे काँग्रेसची अवस्था ही ओसाड गावच्या पाटलासारखी झाली आहे का? असं विचारण्यात आलं. तेव्हा पवार म्हणाले, ‘तिथकं काही मी म्हणत नाही. एकेकाळी काँग्रेस काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत होती. पण ती होती. आहे नाही. होती हे मान्य केलं पाहिजे. मग (विरोधी पक्ष) जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होईल, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -