एकदा आदेश आल्यानंतर तंतोतंत पाळावा लागतो याचं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस – शरद पवार

sharad pawar

आसाममध्ये जे आमदार गेले त्यांची नेतृत्व बदलण्याची मागणी होती. पण भारतीय जनता पार्टीमध्ये आदेश एकदा आल्यानंतर तंतोतंत पाळावा लागतो याचं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत भाजपसह फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

आदेश एकदा दिल्यानंतर तो पाळावा लागतो

कोणताही आदेश हा दिल्लीतून आल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर पडली. याची कल्पना कोणालाच नव्हती. कदाचित शिंदेंना सुजाण नसावी. या कार्यपद्धतीमध्ये आदेश एकदा दिल्यानंतर तो आदेश पाळावा लागतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत, असं शरद पवार म्हणाले.

फडणवीस यांची स्वीकृती मला आश्चर्यकारक वाटली नाही

पाच वर्ष ज्यांनी काम केलं. त्यानंतर विरोधी पक्षाचं नेतृत्व ज्यांनी केलं. त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली, हा तर आश्चर्याला धक्का होता. पण एकदा आदेश आल्यानंतर तो आदेश कसा पाळायचा असतो याचं उदाहरण देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलं आहे. या दोन्ही गोष्टी अशा घडतील असं कुणालाच माहिती नव्हतं. माझ्या मंत्रिमंडळामध्ये शंकरराव चव्हाण हे अर्थमंत्री होते. शंकरराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. पण मी ज्यावेळी मुख्यमंत्री झालो, त्यावेळी शंकरराव चव्हाण माझ्या मंत्रिमंडळात ज्यॉईन झाले. चव्हाणांनंतर शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री होते. त्यानंतर मंत्री बनवण्यात आलं. अशोक चव्हाण तेही राज्याचे मुख्यमंत्री होते. मंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी सुद्धा स्वीकारली. त्यामुळे अशी उदाहरणं महाराष्ट्रात घडलेली आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची स्वीकृती मला आश्चर्यकारक वाटली नाही, असं शरद पवार म्हणाले.

शिंदे यांच्यावर आता जबाबदारी पडली

आता जे मुख्यमंत्री झालेत ते ठाण्याचे प्रतिनिधी आहेत. अनेक वर्ष त्यांनी ठाण्यात काम केलं आहे. पण ते मुळ सातार जिल्ह्यातल्या तालुक्यातले आहेत. योगायोग असा आहे की, महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. माझं मुळ गाव सातार जिल्ह्यामध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आता जबाबदारी पडली आहे. शपथ घेणारी व्यक्ती राज्याचा प्रतिनिधी असतो, तो राज्याचा प्रमुख होतो. त्याला राज्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवावे लागतात. त्यामुळं एकनाथ शिंदेंना मी शुभेच्छा देतो, असं म्हणत पवारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

चेहराच सांगत होता की ते नाराज…

शिंदे हे आमदारांना घेऊन बाहेर राहण्यात प्रभावी ठरले. ४० आमदार बाहेर राहतात ही साधी गोष्ट नाही. ती कुवत शिंदे यांनी दाखवली यातच त्यांचे यश आहे. मी पुन्हा आलो असं म्हणणारे परत आलेत असं वाटतं नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांना भाजपातील पक्ष श्रेष्ठींचा आदेश आल्याने त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे त्यांचा चेहराच सांगत होता की ते नाराज आहेत, असं पवार म्हणाले.


हेही वाचा : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ