घरताज्या घडामोडीधनुष्यबाण शिवसेनेचाच, पक्षाचं चिन्ह काढून घेता येत नाही, पवारांची मुख्यमंत्री शिंदेंवर खोचक...

धनुष्यबाण शिवसेनेचाच, पक्षाचं चिन्ह काढून घेता येत नाही, पवारांची मुख्यमंत्री शिंदेंवर खोचक टीका

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलीच खरी शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर देखील दावा केला आहे. हे प्रकरण आता सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे. याच पार्श्वभूमीवर धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचं आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाचं चिन्ह काढून घेता येत नाही, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

शरद पवार यांनी बारामतीत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचं आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाचं चिन्ह काढून घेणं योग्य नाही. एकनाथ शिंदेंना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते वेगळा पक्ष काढू शकतात. माझ्यात आणि काँग्रेसमध्ये देखील असेच वाद झाले होते. परंतु त्यावेळी आम्ही वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर घड्याळ हे चिन्ह घेतलं होतं. आम्ही त्यावेळी त्यांचं चिन्ह मागून वाद वाढवला नव्हता. पण काहीतरी वाद वाढवण्याची भूमिका घेत असतील. तर लोकशाहीला पाठिंबा मिळणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

यावेळी पवारांनी देश, राज्य आणि आंतरराष्ट्रीय घडामोंडीवर देखील भाष्य केलं. श्रीलंकेत एकाच कुटुंबाची सत्ता होती. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, अर्थमंत्री हे एकाच कुटुंबातील होते. श्रीलंकेत सत्तेचं केंद्रीकरण झालं. त्यामुळे असंतोष वाढायला लागला होता. त्यामुळे जनतेचा उद्रेक झाला. बांगलादेशमध्ये जी परिस्थिती उद्धभवली आहे ती पाकिस्तानमध्ये देखील उद्भवू शकते. आपल्या आजूबाजूला जे वातावरण आहे याची नोंद आमच्या देशाच्या राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे, असा सल्ला देखील शरद पवारांनी दिला आहे.

दरम्यान, सोमवारी ८ ऑगस्ट रोजी खरी शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा?, यावरून दोन्ही गटाला म्हणजेच शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी सांगितले होते. यावेळ शिंदे गटाकडून कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. मात्र, ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे ४ आठवड्यांचा वेळ मागितला होता. त्यानुसार पक्षासंदर्भातील पुरावे सादर करण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत आयोगाने ठाकरे गटाला देत त्यांना मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान, दोन्ही गटाकडून पुरावे सादर झाल्यानंतरच निवडणूक आयोगाला सुनावणी घेता येणार आहे, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : सत्तांतरानंतर समीकरणं बदलली! कांजूर कारशेडविरोधातील लढाईला पूर्णविराम, याचिका मागे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -