घरमहाराष्ट्रशरद पवार गौतम अदानींच्या भेटीसाठी थेट गुजरातला; रोहित पवार म्हणतात...

शरद पवार गौतम अदानींच्या भेटीसाठी थेट गुजरातला; रोहित पवार म्हणतात…

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यात पुन्हा एकदा गुजरातमधील अहमदाबादला पुन्हा एकदा भेट घेतली आहे. गेल्या सहा महिन्यात या दोघांमध्ये तिसऱ्यांदा भेट होत आहे. शरद पवार एका कारखान्याचे उद्घाटन करण्यासाठी अहमदाबादला गेले आहेत. यानंतर त्यांनी गौतम अदानी यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याचे बोलले जात आहे. परंतु या दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याचपार्श्वभमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता त्यांनी भाष्य केलं आहे. (Sharad Pawar Gujarat Gautam Adani Rohit Pawar)

शरद पवार आणि गौतम अदानी भेटीवर बोलताना रोहित पवार म्हणाले की, शरद पवार गौतम अदानी आणि अंबानी यांची भेट घेतात, त्याचप्रमाणे ते छोट्या व्यावसायिकांनाही भेटतात. आपल्या देशाचा विकास कसा करता येईल? यासंदर्भात शरद पवार व्यावसायिकांशी चर्चा करत असतात. त्यानंतर आपण पॉलिसी करत असतो. समाजातील सर्व घटकांना भेटल्याशिवाय पॉलिसी करता येत नाही, असे रोहित पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार, पण…’; अजित पवारांनी ‘या’ नेत्यावर साधला निशाणा

विधानसभा अध्यक्षांना दिल्लीला जावे लागते ही दुर्दैवी गोष्ट

शिवसेना आमदार अपात्रता कारवाईबाबत रोहित पवार म्हणाले की, अपात्रतेच्या कारवाई बाबत सुप्रीम कोर्टाने जसे नियोजन केले होते तसेच नियोजन आताही झाले पाहिजे. तीन महिने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काय केले हे अख्ख्या महाराष्ट्राला सांगावे. स्वाभिमानी राज्याचे अध्यक्ष असताना सुद्धा त्यांना आज दिल्लीला जाऊन मार्गदर्शन घ्यावे लागते आहे, ही आश्चर्याची आणि दुर्दैवी गोष्ट असल्याचा टोलाही रोहित पवार यांनी नार्वेकरांना लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – आमदारांच्या अपात्रतेवरून सुरू असलेल्या गदारोळात केंद्रीय गृहमंत्र्यांचा मुंबई दौरा; घेतले लालाबाच्या राजाचे दर्शन

सहा महिन्यांतील तिसऱ्यांदा भेट

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार हे अहमदाबादमध्ये पुण्यातील एका व्यावसायिकाच्या कारखान्याचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. यानंतर त्यांनी अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांची भेट घेतली. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात यापूर्वी 20 एप्रिल 2023 रोजी मुंबईत भेट झाली होती. यावेळी दोघांमध्ये 2 तास बैठक झाली. हिंडेनबर्ग प्रकरणामुळे गौतम अदानी चर्चेत असताना ही बैठक झाली होती. यानंतर 2 जून 2023 रोजी शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात दुसरी बैठक झाली. यावेळी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली होती. यानंतर आता अहमदाबादमध्ये शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात तिसऱ्यांदा भेट झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -