Homeमहाराष्ट्रनागपूरSharad Pawar : मी संपलो असे म्हणणारे..., शरद पवारांचे देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला...

Sharad Pawar : मी संपलो असे म्हणणारे…, शरद पवारांचे देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर

Subscribe

राज्यात सत्ताधाऱ्यांकडून शरद पवार यांचं राजकीय पर्व संपले असे म्हणत त्यांना डिवचण्याचे कामही केले जात आहे. त्यामुळे आता या प्रचाराला शरद पवारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

नागपूर : भाजपाने अजित पवार यांना आपल्या बाजूने वळवून घेतले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्हही शरद पवार यांच्याकडून काढून घेतले. या गोष्टींमुळे शरद पवारांची महाराष्ट्राच्या राजकारणातील सद्दी संपली आहे, असा प्रचार सध्या महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांकडून शरद पवार यांचं राजकीय पर्व संपले असे म्हणत त्यांना डिवचण्याचे कामही केले जात आहे. त्यामुळे आता या प्रचाराला शरद पवारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या टीकेला उत्तर देताना शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावरही निशाणा साधला आहे. (Sharad Pawar strong reply to Devendra Fadnavis criticism)

हेही वाचा… Lok Sabha 2024 : जोपर्यंत सांगलीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत…, विश्वजित कदम यांचा काँग्रेसला घरचा आहेर

महाविकास आघाडीचे यवतमाळमधील उमेदवार संजय देशमुख आणि अमर काळे यांचे उमेदवारी अर्ज आज मंगळवारी (ता. 02 एप्रिल) भरण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार देखील उपस्थित होते. हे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पवारांनी प्रसार माध्यमांशी नागपूर येथे संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसह विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले.

शरद पवारांची महाराष्ट्राच्या राजकारणातील सद्दी संपली आहे, असा प्रचार सातत्याने सुरू आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता ते म्हणाले की, महाराष्ट्रातील एक नेता आहे. ते आता सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. पाच वर्षांपूर्वी ते प्रत्येक सभेत शरद पवार संपले, असे म्हणत होते. पण निवडणुकीचा निकाल आल्यानंतर अशी परिस्थिती होती की, पुढील अडीच वर्षे शरद पवारांच्या सहकाऱ्यांनी सरकार चालवले आणि त्या नेत्याला विरोधी पक्षात बसावे लागले, असा टोलाच शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये जाऊन त्यांनाच लगावला आहे.

तसेच, शरद पवार यांना सातारा आणि बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी विचारणा करण्यात आली. याबाबत त्यांनी सांगितले की, साताऱ्याची जागा आम्ही 100 टक्के जिंकू. राष्ट्रवादी काँग्रेसकडे तीन चांगले उमेदवार आहेत. तर बारामतीमध्ये अजून निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली नाही. मतदान व्हायचे आहे. मतदान झाल्यानंतरच येथील जनतेचा कल कळेल. यापूर्वी बारामतीमधून सुप्रिया सुळे जिंकल्या आहेत. भविष्यातही त्या जिंकतील, ही अपेक्षा आहे, असे त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : उन्मेष पाटील ठाकरे गटात करणार प्रवेश? भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ म्हणतात…