घरताज्या घडामोडीशरद पवार पुण्यात! बारामतीला जाऊन पार्थ पवारांशी संवाद साधणार?

शरद पवार पुण्यात! बारामतीला जाऊन पार्थ पवारांशी संवाद साधणार?

Subscribe

शरद पवार यांच्या पुणे दौऱ्याचं कारण अद्याप समजलेलं नाही आहे.

राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवारांवर केलेल्या वक्तव्यानंतर पार्थ पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबाची बारामतीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आज शरद पवार सपत्नीक पुण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांच्या कन्या-खासदार सुप्रिया सुळेही सोबत आहेत. पुण्याहून शरद पवार बारामतीला जाणार असल्याचं बोललं जात आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत.

शरद पवार यांनी पार्थ पवारांवर केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण पवार कुटुंबाच्या भोवती फिरतंय. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन पार्थ पवार नाराज आहेत. आणि त्यांची मनधरणी सुरु असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, आज शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार सकाळी दहा वाजताच्या सुमारास मुंबईतील सिल्व्हर ओकमधील निवासस्थानाहून पुण्याला रवाना झाले. दुपारच्या सुमारास ते मोदी बागेतील निवासस्थानी पोहोचले. पुण्याहून पवार दाम्पत्य बारामतीला जाण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या पुणे भेटीचा तपशील गुलदस्त्यात असल्याने नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

- Advertisement -

शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांना फटकारल्यानंतर पवार कुटुंबातील घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, बारामती दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी पार्थविषयी बोलण्यास नकार दिला. मला कुणाशीही काही बोलायचं नाही आहे. मला माझं काम करायचं आहे, असं बोलून अजित पवार निघून गेले. पार्थ पवार प्रकरणावर अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून ते विविध विकासकामांची पाहणी करत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -