घरमहाराष्ट्रशरद पवार महाआघाडीच्या तयारीत!

शरद पवार महाआघाडीच्या तयारीत!

Subscribe

भाजपविरोधात महाआघाडीचे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिले आहेत. ही आघाडी देशपातळीवर होणार नसून राज्य पातळीवर होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपविरोधात महाआघाडीचे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिले आहेत. ही आघाडी देशपातळीवर होणार नसून राज्य पातळीवर होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारकडून धनगर, मराठा समाजाची फसवणूक होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले असून आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारविरोधात हल्लाबोल केला आहे. शिवाय लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र लढणार असं भाकितं त्यांनी केलं आहे. पाटण येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी भाजपवर सडकून टीका केली. यावेळी देशाचं नेतृत्व सोनिया आणि राहुल गांधी समक्षपणे करू शकतील, असा विश्वास त्यांनी दर्शवला. तसेच महाआघाडीसाठीचे प्रयत्न आपण सुरु केले असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

वाचा : शरद पवार आणि बीजू जनता दलाची बैठक सुरु

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले पवार

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मंगळवार, २५ डिसेंबर रोजी सातारा जिल्ह्यात पाटणमध्ये शेतकरी मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते. या व्यासपीठावर बोलताना त्यांनी गांधी कुटुंबीयांची स्तुती केली. राहुल गांधी हेच देशाचं नेतृत्व करण्यास योग्य आहेत, असंही ते यावेळी म्हणाले. ‘देशात पर्यायी आघाडी न करता राज्यपातळीवर आघाडी करणार. आघाडी करताना कुठलाही नवा चेहरा समोर करणार नाही, अशी दोन महत्त्वाची विधानं त्यांनी यावेळी केली. त्यांच्या या दोन्ही विधानांमुळे लोकांनी वेगवेगळे तर्क-वितर्क काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पवारांना नेमकं काय म्हणायचं आहे, याबद्दल मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.’

वाचा : गोंदियाच्या शिक्षक साहित्य संमेलनात शरद पवार येणार

- Advertisement -

महाआघाडीच्या तयारीसाठी…

शरद पवार हे राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. पक्षाच्या मतमतांतरापलीकडे सर्व नेते त्यांच्याशी चांगला संपर्क करून आहेत. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील मागे नाहीत. अनेकदा राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या सार्वजनिक ठिकाणी संवाद झालेला आपण पाहिला आहे. नुकत्याच विदर्भ दौऱ्यावरदेखील दोघं एका विमानातून प्रवास करत असताना त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असावी, याबाबत तर्क लावले जात होते. त्यामुळे राज्यपातळीवरील महाआघाडीत कोणकोण असणारं यावर सस्पेन्स कायम आहे.

वाचा : शरद पवार – राज ठाकरेंच्या ‘विमान भेटी’त काय बोलणं झालं?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -