घरमहाराष्ट्रसत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे दिसतंय; पवारांचा फडणवीसांना चिमटा

सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे दिसतंय; पवारांचा फडणवीसांना चिमटा

Subscribe

आजही मीच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस यांना चिमटा काढला. सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे यातून दिसून येतं, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला. मुंबईत पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

पाच वर्ष सत्तेत असल्याचं स्मरण राहणं हे कधीही चांगलंच आहे. वेदना किती खोल आहे हे यातून दिसतं, पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. मी चार वेळा मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलंही नाही. ही आमची कमतरता आहे आणि हे मी कबूल करतो, असं म्हगणत सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे यातून दिसून येतं, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

- Advertisement -

‘मला आजही मीच मुख्यमंत्री आहे असं वाटतं’ – देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई येथे महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्यासारखे नेते माझ्या पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचं नाही, तो काय करतो हे महत्त्वाचं आहे. गेले दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला जनतेने देखील हे जाणवू दिलं नाही की मी आता मुख्यमंत्री नाही आहे. विरोधी पक्षनेता म्हणून काम करतोय. ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी पहिल्यांदा गोवर्धिनी मातेकडेच मी येणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी नवी मुंबईत पुन्हा आम्हीच निवडून येऊ आणि आम्ही पुन्हा एकदा सेवा करू, असा विश्वासही व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – सांगितल्याशिवाय बाहेर न पडण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना; आयकरच्या छाप्यांवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

मावळमध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावलं; फडणवीसांच्या टीकेला पवारांचं उत्तर

चीनशी होत असलेल्या चर्चा अयशस्वी होणं हे चिंताजनक – शरद पवार


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -