घरमहाराष्ट्रपुणेSharad Pawar : त्यांच्या धरसोडवृत्तीमुळे 'तो' निर्णय घेतला; अजितदादांच्या गौप्यस्फोटावर शरद पवार...

Sharad Pawar : त्यांच्या धरसोडवृत्तीमुळे ‘तो’ निर्णय घेतला; अजितदादांच्या गौप्यस्फोटावर शरद पवार म्हणतात…

Subscribe

पुणे : कर्जत येथे आयोजित वैचारिक मंथन शिबिरात बोलताना अजित पवार यांनी काही गौप्यस्फोट केले होते. यावर बोलताना शरद पवार यांनी म्हणाले की, अजित पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटातील बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच कळल्या, असा टोला लगावला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राज्यातील पाणी टंचाई आणि अतिवृष्टी यावरही भाष्य केलं. (decision was taken because of his complacency Sharad Pawar says on Ajit pawar secret blast)

अजित पवारांच्या गौप्यस्फोटावर बोलताना शरद पवार म्हणाले की, पक्षाचा अध्यक्ष मीच होतो, माझी भूमिका स्पष्ट होती की, भाजपाबरोबर जायचं नाही. भाजपासोबत जाण्याची भूमिका आमची नव्हती. अजित पवारांची भूमिका आमच्याशी सुसंगत नव्हती. त्यामुळे मी राजीनामा देण्याचं कारण काय होतं? असा प्रश्न उपस्थित करत मी पक्षाचा अध्यक्ष होतो. प्रत्येकाला माझ्याशी सुसंवाद साधण्याचा पूर्ण अधिकार होता. ज्या मागण्या केल्या, त्याबाबत चर्चा झाली नाही, असं मी म्हणत नाही, पण चर्चा झाली होती. परंतु त्यांचे विचार आमच्या विचाराशी सुसंगत नव्हते. जनतेला आम्ही जी आश्वासनं दिली होती, त्या भूमिकेशी ते विसंगत होतं, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar : निवडणुका झाल्यानंतर एक नवी फळी दिसेल; आमदार बैठकीत शरद पवाराचं वक्तव्य

विधानसभेमध्ये जनतेकडे आम्ही जी मत मागितली ती भाजपासोबत जाण्यासाठी मागितली नव्हती. भाजपाच्या विरोधात आमची भूमिका होती. त्यामुळे जे लोकं आमचे निवडून आले त्यांना मतदारांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्यासोबत गेलो असतो तर जनतेची दिशाभूल झाली असती. त्यांचे विचार आमच्या जाहिरनाम्याशी विसंगत होते. त्यामुळे भाजपासोबत न जाण्याची भूमिका माझ्यासह अनेकांनी घेतली, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

गाफील ठेवल्याबाबतच्या वक्तव्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मी अध्यक्ष होतो आणि निर्णय घेण्यासाठी मी सक्षम आहे. त्यामुळे कुठल्या नेत्याला विचारुन मी निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही. मी राजीनामा दिला आणि तो परत घ्यायचा असेल तर मला परांजपे किंवा आव्हाड यांची परवानगी घ्यायची गरज नाही. निर्णय घेण्याची माझी कुवत आहे, असंही शरद पवार म्हणाले.

हेही वाचा – Pawar Vs Awhad : अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाडांना विचारले थेट तीन प्रश्न…

अजित पवारांनी निवडणुकीच्या आधी घ्यायला हवा होता

शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका वेगळी होती. आज आमची भूमिका भाजपासोबत न जाण्याची होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र बसून शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, या लोकांनी थेट सत्तेत जाऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. हा यातील फरक आहे. अजित पवार खोटं बोलत आहेत. काही गोष्टी मला पहिल्यांदाच कळाल्या आहेत. लोक निर्णय घेतील तो स्वीकारायचा असतो. कोणी काही स्टेटमेंट करेल ते मी का स्वीकारावं? असा प्रश्न उपस्थित करत कोणी काय भूमिका घ्यावी, हा त्यांचा अधिकार आहे. पण, त्यांनी हा निर्णय निवडणुकीच्या आधी घ्यायला हवा होता, असा टोला शरद पवार यांनी अजित पवारांना लगावला.

अजित पवार काय म्हणाले?

कर्जत येथे आयोजित वैचारिक मंथन शिबिरात बोलताना अजित पवार म्हणाले होते की, सरकारसोबत जा, मी राजीनामा देतो, असं शरद पवार म्हणाले होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. तसेच शरद पवार यांनीच सत्तेत सहभागी व्हावं असं सांगितलं होतं. शरद पवार यांची सातत्याने धरसोडवृत्ती सुरू होती, त्यामुळेच आम्हाला निर्णय घ्यावा लागला, असा दावा अजित पवार यांनी केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -