घरताज्या घडामोडीशरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, सुप्रिया सुळेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, सुप्रिया सुळेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

Subscribe

शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअपवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर सुप्रिया सुळे यांनी तत्काळ या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना याआधी अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. पण आज (ता. 09 जून) पुन्हा एकदा शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअपवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर सुप्रिया सुळे यांनी तत्काळ या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तर यानंतर जर का काही बरं वाईट झाले तर याला पूर्णतः केंद्रीय गृह मंत्रालय आणि राज्याचे गृह मंत्रालय जबाबदार असेल, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा – उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा

- Advertisement -

सुप्रिया सुळे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त यांची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, आज सकाळी त्यांच्या व्हॉट्सअपवर मेसेज आला. एका वेबसाईटच्या माध्यमातून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामध्ये “लवकरच तुमचा दाभोलकर होणार…” असे लिहिण्यात आले आहे. तर या मॅसेजवर अनेकांच्या कमेंटदेखील आहेत. त्यामुळे आता या प्रकरणी गृह खात्याने तातडीने दखल घेत कडक कारवाई करावी. असेही यावेळी सुप्रिया सुळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. हा विषय मुंबईच्या सीपींना सांगण्यात आला असून ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, असेही त्या म्हणाल्या

राजकारणात मतभेद असतात. पण इतका द्वेष पसरणे हे दुर्दैवी आहे. शरद पवारांना मिळालेल्या धमकीचा सखोल तपास केला पाहिजे. महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे. मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. भविष्यात काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार देशाचे आणि राज्याच्या गृहमंत्री जबाबदार आहे, असेही सुप्रिया सुळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर तक्रारीची दखल करत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

शरद पवार यांना जी धमकी देण्यात आली आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात यावा, त्यानंतर या प्रकरणी एक महिला आणि नागरिक म्हणून मी न्याय मागत आहे. या सगळ्याची जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य सरकारची आणि गृह मंत्रालयाची आहे. राज्यात जे काही सुरु आहे, त्यामुळे गृह खाते पूर्णतः अयशस्वी ठरले आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही असेही सुप्रिया सुळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर हे सरकारच्या गुप्तचर खात्याचे अपयश असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ पिंपळकर नामक व्यक्तीने पहिल्यांदा त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने हे ट्वीट आपल्या अकाउंटवरून डिलीट केले. सदर व्यक्ती ही भाजप कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा शब्द मुंबई पोलीस आयुक्तांनी दिल्याचे सुप्रिया सुळेंनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -