घरमहाराष्ट्र‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली पंधरा विरोधी पक्ष एकत्र, आज बैठक

‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली पंधरा विरोधी पक्ष एकत्र, आज बैठक

Subscribe

शरद पवारांचे नेतृत्व, काँग्रेस दूर, भाजपविरोधात मोर्चेबांधणी सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सोमवारी भेट घेतली आहे. त्यावरून तर्कवितर्क लढवले जात असतानाच शरद पवार यांनी मंगळवारी विरोधी पक्षांची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला 15 पक्षांचे नेते सामील होणार आहेत. या बैठकीत राष्ट्रमंच या बॅनरखाली एकत्र येण्यावर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मंगळवारी होणार्‍या या बैठकीला 15 राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपविरोधात एकत्र येण्यासाठी यूपीएच्या बॅनरखाली एकत्र येण्याऐवजी नवे बॅनर घेऊन एकत्र येण्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यूपीए फेल गेल्याने राष्ट्रमंचच्या बॅनरखाली एकत्र आल्यास भाजपला धक्का देणं सोपे जाईल. या नव्या बॅनरच्या माध्यमातून देशभरातील जनतेला आकर्षित करणं सोपं जाईल, असं काही नेत्यांचं मत असल्याने राष्ट्रमंच नावाने नवी आघाडी उघडण्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते.

- Advertisement -

सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्षा आहेत. त्या आजारी असल्याने यूपीएचं अध्यक्षपद पवारांकडे देण्याची मागणी होत आहे. मात्र, काँग्रेसने पद सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राष्ट्रमंच नावाने तिसरा पर्याय निर्माण करून त्यांचे नेतृत्व पवारांकडे दिले जाण्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळातील भाजप विरोधातील आघाडी पवारांच्या नेतृत्वाखालील असेल की काँग्रेसच्या हे उद्याच्या बैठकीतूनच स्पष्ट होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विरोधकांना एकत्र आणणे हेच पवारांचे लक्ष्य- मलिक

आता विरोधकांना एकत्र आणणे हाच शरद पवार यांचा अजेंडा असणार आहे, असे मत अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मांडलं आहे. आता 15 पक्ष एकत्र आहेत. मात्र, मोजकेच पक्ष सोबत नाहीत; पण हळूहळू त्यांना एकत्र कसे आणता येईल हे ठरवण्यात येईल, असेही मलिक यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे काम करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

नेतृत्व पवारांचे, चेहरा ममतांचा
राष्ट्रमंचच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच भाग घेणार आहेत. राष्ट्रमंचची पायाभरणी 2018 साली यशवंत सिन्हा यांनी केली होती. सध्या तरी कोणत्याच राजकीय वाटणीची घोषणा राष्ट्रमंचाकडून करण्यात आलेली नाही. मात्र, राष्ट्रमंचच्या माध्यमातून भविष्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ममता बॅनर्जी यांना तिसर्‍या आघाडीचा चेहरा बनवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -